शिये-भुये रस्त्यावर अज्ञातांकडून ट्रॅक्‍टर पेटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिये-भुये रस्त्यावर अज्ञातांकडून ट्रॅक्‍टर पेटवला
शिये-भुये रस्त्यावर अज्ञातांकडून ट्रॅक्‍टर पेटवला

शिये-भुये रस्त्यावर अज्ञातांकडून ट्रॅक्‍टर पेटवला

sakal_logo
By

ऊसदर आंदोलन पेटले
---
शिये-भुये रस्त्यावर ट्रॅक्‍टर पेटविला
कोल्हापूर, ता. ११ : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आज अनोळखी व्यक्तींनी पेटविला. हा प्रकार शिये-भुये (ता. करवीर) रस्त्यावर रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.
जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ‘एफआरपी’पेक्षा वाढीव रक्कम दिली आहे. दालमिया कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील ४६ रुपये कमी दिले. त्यामुळे पहिली उचल तीन हजार २२३ रुपये देण्याच्या मागणीसाठी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची कारखान्याने दखल घेतलेली नाही. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाव्यतिरिक्त इतर लोक चर्चेत आले. त्यामुळे आंदोलनाला वेगळे वळण देऊन ते चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.
दरम्यान, आज रात्री उशिरा शिये-भुये मार्गावर उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पेटविण्यात आला. यात ट्रॅक्‍टरचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या प्रकारामुळे ऊस वाहतूकदार व ट्रॅक्‍टर चालकांत भीतीचे वातावरण आहे. काहींनी कोठेही न थांबता ट्रॅक्टर कारखान्यांकडे नेले आहेत; तर काही ट्रॅक्‍टर पुन्हा शिवाराकडे परतल्याचे चित्र होते.