गड-निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-निधन वृत्त
गड-निधन वृत्त

गड-निधन वृत्त

sakal_logo
By

६१८७८
मधुमालती जाधव
गडहिंग्लज : येथील हुजरे गल्लीतील मधुमालती दौलतराव जाधव (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पालिकेचे निवृत्त बांधकाम अभियंता सयाजी भोसले यांच्या त्या भगिनी होत. सोमवारी (ता. १४) आहे.

०२४४०
शांताबाई निंबाळकर
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथील श्रीमती शांताबाई विश्वासराव निंबाळकर (वय ९९) यांचे निधन झाले. विजयादेवी घाटगे दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव निंबाळकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १४) आहे.

३००३
रजाक सनदी
कबनूर ः येथील सनदी मळ्यातील रजाक गुलाब सनदी (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे आहेत.

१३९३
शिवाजी गवळी
बाजारभोगाव : बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील शिवाजी गोविंद गवळी (वय ७५) यांचे निधन झाले. भोगेश्वर दूध संस्थेचे माजी अध्यक्ष अंबाजी गवळी यांचे ते बंधू तर ग्रामपंचायत सदस्य अमोल गवळी यांचे चुलते होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

१९३६
विलास पाटील
बोरपाडळे : आरळे (ता. पन्हाळा) येथील विलास महादेव पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

१८०९
पांडुरंग पाटील
पेठवडगाव : येथील पांडुरंग कृष्णात पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. ते वारणा बॅंकेत निवृत्त अधिकारी होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१९३४
शोभा पाटील
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील शोभा पांडुरंग पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

३१२८
कुमार बिल्ले
राशिवडे बुद्रुक : येथील कुमार श्रीपती बिल्ले (वय ५९) यांचे निधन झाले. ते हसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

६१९९७
महादेव निऊंगरे
इचलकरंजी : येथील ज्येष्ठ उद्योजक महादेव जोमा निऊंगरे (वय ७७) यांचे शुक्रवारी (ता. ११) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

३८५३
मंगल देसाई
कुंभोज : येथील कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संचालिका मंगल महावीर देसाई (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

२४४४
बाळू कांबळे
सिद्धनेर्ली : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील बाळू सावबा कांबळे (वय ८८) यांचे निधन झाले. कोतवाल दयानंद कांबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

२४४२
लक्ष्मीबाई टिपुगडे
सिद्धनेर्ली : बामणी (ता. कागल) येथील श्रीमती लक्ष्मीबाई शामराव टिपुगडे (वय ७०) यांचे निधन झाले.

61952
बाळासो खाडे
कोल्हापूर : गोळीबार मैदान, कसबा बावडा येथील बाळासो शिवराम खाडे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

61957
बाळाबाई दुबुले
कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील बाळाबाई नारायण दुबुले (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

61958
तानाजी गुरव
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील तानाजी बाबूराव गुरव (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

61960
सुमित्रा दळवी
कोल्हापूर : नागाळा पार्क, शिवराज एसबीआय हौसिंग सोसायटीतील सौ. सुमित्रा दळवी (वय ८०) यांचे निधन झाले. स्टेट बँकेतील निवृत्त अधिकारी विलासराव दळवी यांच्या त्या पत्नी होत. भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी शिवडाव (ता. कणकवली) येथील मेजर बी. आय. सावंत-पटेल यांच्या कन्या होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

61963
अरुण अजगर
कोल्हापूर : दौलतनगरातील अरुण मारुती अजगर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

61966
भारत पाटील
कोल्हापूर : येथील भारत ज्ञानदेव पाटील यांचे निधन झाले. ते बांधकाम व्यावसायिक आणि मराठा महासंघाचे संघटक होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) बापट कॅम्प स्मशानभूमीत आहे.

61969
शिवाजी घाटगे
ोकोल्हापूर : राजारामपुरी पाचवी गल्लीतील शिवाजी यशवंत घाटगे (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

१०७८
स्नेहल कुंभार
सांगवडेवाडी : सांगवडे (ता. करवीर) येथील स्नेहल बसवंत उर्फ दगडू कुंभार (वय ३२) यांचे निधन झाले. त्या विद्यमान सरपंच रूपाली कुंभार यांच्या भावजय होत. त्यांच्या मागे पती, मुलगा व सासू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १३) आहे.

०६८६
गणपती कुरणे
प्रयाग चिखली : येथील गणपती बापू कुरणे (वय ७२) यांचे निधन झाले. प्रा. नितीन कुरणे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.


01775
दगडू वाडकर
हळदी : पिरवाडी (ता. करवीर) येथील दगडू तुकाराम वाडकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.