सर्वच ग्रामपंचयातीत आचारसंहिता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वच ग्रामपंचयातीत आचारसंहिता
सर्वच ग्रामपंचयातीत आचारसंहिता

सर्वच ग्रामपंचयातीत आचारसंहिता

sakal_logo
By

सर्वच ग्रामपंचायतीत आचारसंहिता
४७५ ठिकाणी निवडणूक; विकासकामे खोळंबणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १२ : जिल्‍ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक आहे, त्यांच्या सीमेवर असणाऱ्या‍ ग्रामपंचायतींनाही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे १०२१ पैकी १ हजारपेक्षा अधिक गावांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. वित्त आयोगासह इतर उपलब्‍ध निधी आता आचारसंहितेनंतर खर्च करावा लागणार आहे.
जिल्‍ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. २८ नोव्‍हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. २८ नोव्‍हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल केले जाणार आहेत. महत्त्‍वा‍चे म्‍हणजे ज्या ग्रामपंचायतीत निवडणूक होणार आहे, त्या ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आता निवडणूक असणाऱ्या‍ ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अपवाद वगळता जिल्‍ह्यातील सर्व गावांना आचारसंहितेचा दणका बसला आहे. नोव्‍हेंबर, डिसेंबरपासून गावांना निधी उपलब्‍ध होतो. मात्र या काळातच आचारसंहिता लागू झाल्याने विकासकामांचे नियोजन हे जानेवारी महिन्यानंतर करावे लागणार आहे.