गड-एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-एक ठार
गड-एक ठार

गड-एक ठार

sakal_logo
By

61937 मारुती नार्वेकर
---------------------------------

ट्रॅक्टर उलटून वृद्ध ठार
---
मृत औरनाळचा; बड्याचीवाडीजवळ अपघात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : अंथरुण-पांघरुण धुऊन परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. मारुती सिद्धू नार्वेकर (वय ६०, रा. औरनाळ, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) हद्दीतील एमआयडीसी आवारात हा अपघात झाला.
मारुती स्वत:च्या ट्रॅक्टरमधून (एमएच ०९, जीए ५०६१) घरातील अंथरुण-पांघरुण घेऊन शेंद्री तलावात धुण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर कुटुंबातील अन्य सदस्यही होते. अंथरुण-पांघरुण धुऊन झाल्यावर ट्रॅक्टरमधून ते औरनाळकडे परत जात होते. दरम्यान, काळभैरी ते एमआयडीसीमधील सूतगिरणीच्या रस्त्यावर ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूला जाऊन ट्रॉलीसह पलटी होऊन सुमारे १५ फूट खाली कोसळला. यात मारुती यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मारुती यांच्या आईचे आठवडाभरापूर्वीच निधन झाले. आईपाठोपाठ मुलाच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मारुती यांची गावातील अरविंद विकास सेवा संस्थेच्या संचालकपदी तीन महिन्यांपूर्वीच निवड झाली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.