अतिक्रमणांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका
अतिक्रमणांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका

अतिक्रमणांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका

sakal_logo
By

61939
---------
अतिक्रमणांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका
आमदार प्रकाश आवाडे; कोरोची सिद्धार्थनगर येथे बैठक
इचलकरंजी, ता. १३ ः गायरानातील अतिक्रमणे काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे कोणीही घाबरु जावू नये. राज्य सरकारसुध्दा यासंदर्भात सकारात्मक आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोची (ता. हातकणंगले) येथील सिध्दार्थनगर परिसरातील नागरिकांना दिला.
कोरोचीमधील सिध्दार्थनगर येथे मोठ्या प्रमाणात कामगारवस्ती असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी शनिवारी संतोष भोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आवाडे यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. प्रदीर्घ काळापासून आम्ही या जागेवर राहण्यास असून आता तेथून हटवल्यास आम्ही कोठे जायचे, असा सवाल करतांना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी आमदार आवाडे यांनी आपण याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती देत या लढ्यात मी तुमच्यासोबत असणार असून कोणाच्याही घराला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी विकास खरात यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. चर्चेवेळी प्रकाश दत्तवाडे, पप्पू गुरव, बबलू कांबळे, बबन आवळे, गणेश शिंदे, आण्णा कांबळे, दीपक भोरे, लखन केसरकर, प्रतिभा साखळकर, कविता कांबळे, निशा मागाडे, अनिता देवमाने आदी नागरिक उपस्थित होत्या.
-------------
शिरोली-हातकणंगले रस्ता दुरुस्तीची सुचना
इचलकरंजी, ता. १३ ः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह कर्नाटक राज्याला जोडणारा महत्वाचा मार्ग असलेल्या मौजे शिरोली ते हातकणंगले या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्राधान्यक्रमाने हा रस्ता दुरुस्तीच्या सूचना संबंधित मक्तेदार कंपनीला दिले आहेत. या प्रश्‍नी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला होता.
या महामार्गावर लहान मोठ्या सर्व प्रकारच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतू ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरूस्त करणे गरजेचे असल्याने हा महामार्ग तातडीने दुरूस्त करण्यासंदर्भात राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकांकडे आमदार आवाडे यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. या प्रयत्नांना यश येऊन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संबंधित मक्तेदार कंपनीला प्राधान्यक्रमाने हा महामार्गाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची माहिती आमदार आवाडे यांनी दिली.