गायरान प्रश्‍नी मोर्चाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायरान प्रश्‍नी मोर्चाचे आयोजन
गायरान प्रश्‍नी मोर्चाचे आयोजन

गायरान प्रश्‍नी मोर्चाचे आयोजन

sakal_logo
By

सर्वपक्षीय नेते सहभागी होणार
कोल्हापूर, ता. १३ : गायरान जमिनीवरील अतिक्रमण डिसेंबरपूर्वी काढण्याच्या शासन धोरणाविरुद्ध मंगळवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गायरान अतिक्रमण बचाव संघर्ष समितीतर्फे निघणाऱ्या मोर्चात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारीसह दहा हजार अतिक्रमणधारक सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा. शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. कांबळे म्हणाले, ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, रिपाईं (गवई गट), दलित महासंघ, जनसुराज्य, राणी लक्ष्मीदेवी बेघर संघटना हुपरी अशा सोळा पक्ष, संघटनांनी सहभागी होण्यासाठी पाठिंबा दिला आहे.’