महावितरण कंपनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण कंपनी
महावितरण कंपनी

महावितरण कंपनी

sakal_logo
By

महावितरण नाट्यस्पर्धेत ‘नजरकैद’ प्रथम
पुणे संघाचे ‘सवाल अंधाराचा’ व्दितीय ः पाच नाटके सादर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः महावितरण कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या नाट्यस्पर्धेत औरंगाबाद विभागातील नांदेड परिमंडलाने सादर केलेल्या ‘नजरकैद’ या नाटकाला प्रथम क्रमांक तर पुणे प्रादेशीक विभागातील पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘सवाल अंधाराचा’ नाटकाने व्दितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाना महावितरणचे संचालक संजय ताकसांडे व अभिनेते ऋषीकेश जोशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात गेली दोन दिवस या स्पर्धा सुरू होत्या. यात राज्यभरातील पाच संघाची पाच नाटके सादर केली त्याचा बक्षीस वितरण समारंभ येथे झाला.
ताकसांडे म्हणाले, ‘‘कोल्हापूर ही कलावतांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत महावितरणच्या कलावंताना कला सादर करता आली. ही महावितरणसाठी अभिमानाची बाब आहे.
ऋषीकेश जोशी म्हणाले, ‘‘कोल्हापूरातुन मी नाट्यकला सादर करीतच माझा अभिनेत्यापर्यंतचा प्रवास केला. कोल्हापूरनेच कलावंत म्हणून घडवले. महावितरणमध्ये ही अनेक उत्तम कलाकार, लेखक आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणकडून नाट्यस्पर्धा घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.’
बक्षीस वितरणप्रसंगी प्रादेशिक संचालक अकंश नाळे, मुख्य अभियंता विजय भटकर, सचिन तोलावार, सुनिल देशपांडे, संयोजक मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिक कांबळे प्रमुख उपस्थित होते. हिमांन्शु स्मार्त, प्राची गोडबोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले.