संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फक्त फोटो- ६१९७३

सुप्रजा बालचिकित्सालयात
उद्यापासून मोफत तपासणी
कोल्हापूर ः लक्ष्मीपुरी सत्यवादी भवन शेजारील सुप्रजा बालचिकित्सालयात बालदिनानिमित्त सोमवार (ता.१४) पासून बालकांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. सलग पाच दिवस सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हे शिबिर होणार असून बालरोगतज्ञ डॉ. स्नेहल पाटील तपासणी करणार आहेत. बालकांच्या विविध विकारांबरोबरच सध्या थंडीचे दिवस असून बालकांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतही त्या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रजा बालचिकित्सालयातर्फे करण्यात आले आहे.
----------
61987
नागेश हंकारे यांची कलाकृती

नागेश हंकारे यांच्या
कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार
कोल्हापूर ः ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस सोसायटी न्यू दिल्ली (आयफेक्स) आयोजित ९५ व्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनात येथील चित्रकार नागेश हंकारे यांच्या ‘ब्युटी ऑफ द नेचर’ या चित्रास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा सोळा डिसेंबरला दिल्ली येथे होणार आहे.
---------------
61988
हेमलकसा ः येथे आमटे परिवारासोबत स्नेहसंगीतप्रतिज्ञा परिवार.

लोक बिरादरी प्रकल्पात
‘स्नेहसंगीतप्रतिज्ञा‘ची मैफल
कोल्हापूर ः हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पात येथील स्नेहसंगीतप्रतिज्ञा उपक्रमांतर्गत मैफल रंगली. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांच्यासह आमटे परिवाराच्या उपस्थितीत ही मैफल झाली. गेल्या सलग एक हजार ३१९ दिवसातील ही सलग एक हजार ५३८ क्रमांकाची मैफल होती.
‘स्नेहसंगीतप्रतिज्ञा‘च्या नरहर कुलकर्णी, अमरसिंह रजपूत, दिलीप माळी, चंद्रशेखर फडणीस, डॉ. मिलिंद गायकवाड, मंजिरी लाटकर आणि प्रशांत जोशी तसेच ध्वनी संयोजक रमेश सुतार, सूत्रधार नीलांबरी फडणीस, राजेंद्र चौगुले यांचा यावेळी सत्कार झाला. डॉ.प्रकाश आमटे यांनी त्यांच्या आजारपणाच्या दरम्यान ‘प्रतिज्ञा‘ने केलेल्या सलग १६८ तासांच्या स्नेह स्वरांच्या अष्टोप्रहर प्रार्थना मैफिलीचा यावेळी विशेष उल्लेख केला. यावेळी सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील यांचाही विशेष सन्मान झाला. विश्राम कुलकर्णी, मिलिंद नाईक, प्रशांत जोशी आणि अनिकेत आमटे यांनी संयोजन केले.