किरणोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरणोत्सव
किरणोत्सव

किरणोत्सव

sakal_logo
By

61996
.....

सलग दुसऱ्या दिवशी
देवीचे मुखकमल उजळले

किरणोत्सव सोहळ्याचा आज अखेरचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या किरणोत्सव सोहळ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीच्या मुखावर सोनसळी अभिषेक केला. सोहळ्याचा आजचा चौथा दिवस होता. पूर्ण क्षमतेने सध्या हा सोहळा सुरू असून तो अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. देवस्थान समितीतर्फे मंदिर परिसरात तीन एलईडी स्क्रीन उभारले असून डिजिटल माध्यमावरही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, उद्या (रविवारी) सोहळ्याचा पाचवा व अखेरचा दिवस आहे.
काल सूर्यकिरणांनी देवीचे मुखकमल उजळले होते. साहजिकच आजच्या सोहळ्याबाबत भाविकांत मोठी उत्सुकता होती. चारपासूनच हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी होऊ लागली. सायंकाळी चार वाजून ५९ मिनिटांनी महाव्दार गेटला सूर्यकिरणे पोचली. त्यानंतर पंचवीस मिनिटांनी ती गरूड मंडपमार्गे गणपती मंदिराच्या मागील बाजूस पोचली. पाच वाजून ३१ मिनिटांनी कासव चौक, त्यानंतर तीन मिनिटांनी पितळी उंबरा, पाच वाजून ३८ मिनिटांनी चांदीचा उंबरा असा प्रवास करत पाच वाजून ४४ मिनिटांनी सूर्यकिरणांची देवीचा चरणस्पर्श केला. पाच वाजून ४८ मिनिटांनी पूर्णपणे चेहऱ्यावर सूर्यकिरण झळकली आणि किरीटला स्पर्श करून डावीकडे सरकली, अशी माहिती प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.