विधिसेवा प्राधिकरण मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधिसेवा प्राधिकरण मेळावा
विधिसेवा प्राधिकरण मेळावा

विधिसेवा प्राधिकरण मेळावा

sakal_logo
By

साडेतीन हजारांवर खटले निकाली
राष्ट्रीय लोकअदालत; ५२ कोटींची तडजोड रक्कम वसूल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ ः राष्ट्रीय लोकअदालतीच्या उपक्रमाच्या माध्यमातून विधि सेवा प्राधिकरणाने प्रलंबित खटले आज निकाली काढले. यामध्ये ३ हजार ८०७ खटले तडजोडीने मिटवण्यात आले. यातून ५२ कोटी ६८ लाख ४५ हजारांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. यासाठी जिल्ह्याभरात ४५ पॅनेल बनवण्यात आले होते.
न्‍यायालयात प्रलंबित असलेली ११ हजार ४७४ प्रकरणे व दाखलपूर्व ३९, ०८६ प्रकरणे लोक अदालतीमध्‍ये ठेवण्‍यात आली होती. यापैकी अपघात नुकसानीचे ५४ दावे तडजोडीने मिटवून ३ कोटी ४९ लाख, ४२ हजारांची रक्‍कम मंजूर करण्‍यात आली. एन.आय. ॲक्‍ट कलम १३८ नुसार ४४६ प्रकरणे तडजोडीअंती ३१ कोटी ४३ लाखांची रक्‍कम मिळवून देण्‍यात आली. बँक रिकव्‍हरीतील ७७५ प्रकरणातून २ कोटी ९७ लाखांची रक्‍कम वसूल करण्‍यात आली. ग्रामपंचायतीकडील पाणी बिलाच्‍या ७८८ प्रकरणांमध्‍ये ४ लाख ५० हजारांची वसुली करण्‍यात यश आले. पती-पत्‍नीच्‍या वादातून न्‍यायालयाकडे दाखल खटलेही लोक अदालतसमोर ठेवण्‍यात आले होते. यासाठी नेमलेल्‍या पॅनेलमधील विधी सेवकांनी यामध्‍ये मध्‍यस्‍थी व समुपदेशनाद्वारे अनेकांची मने वळविण्‍याचा प्रयत्‍न केला. यामध्‍ये यश येवून कौटूंबिक खटल्‍यातील ४४६ प्रकरणे तडजोडीने मिटवून हे संसार पुन्‍हा जुळविण्‍यात आले. प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश के. बी. अग्रवाल यांच्‍याहस्‍ते कसबा बावडा न्‍यायसंकूल येथे लोकअदालतचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा न्‍यायाधीश एस. आर. साळुंखे, एस. एस. तांबे, एस. एस. जगताप, एस. एस. काकडे, व्‍ही. पी. गायकवाड, दिवाणी न्‍यायाधीश एस. ए. बाफना, जिल्‍हा बार असोसिएशनचे अध्‍यक्ष गिरीश खडके, विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रीतम पाटील यांची प्रमुख उपस्‍थिती होती.