फळभाज्यांचे दर उतरू लागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळभाज्यांचे दर उतरू लागले
फळभाज्यांचे दर उतरू लागले

फळभाज्यांचे दर उतरू लागले

sakal_logo
By

gad133.jpg
62058
गडहिंग्लज : आठवडा बाजारात मिरची, फळभाज्यांच्या रोपांची आवक सुरू झाली आहे. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------

फळभाज्यांचे दर उतरू लागले
आवक वाढल्याचा परिणाम : कोंथिंबिर पूर्वपदावर; रोपांना मागणी, बिन्सचे भाव कायम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : गेले दोन महिने तेजीत असणाऱ्या फळभाज्यांचे दर उतरू लागले आहेत. भाजी मंडईत आवक वाढू लागल्याने हा परिणाम झाला आहे. कोथिंबिरीचा दरही पूर्वपदावर आला आहे. बिन्स, दिडग्याचे वाढलेले भाव कायम आहेत. उसाची काढणी सुरू झाल्याने मिरची, फळभाज्यांच्या रोपांना मागणी वाढली आहे. फळबाजारात नागपूरच्या संत्र्याची आवक अधिक आहे.
सहा महिने भाजी मंडईत फळभाज्यांचे दर चढेच आहेत. सुरुवातीला आणि समारोपाला परतीच्या अधिक पावसाने फळभाज्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे सरासरी ८० ते १०० रुपये असाच किलोचा दर राहिला. गेल्या आठवड्याभरापासून मंडईत फळभाज्यांची आवक वाढू लागली आहे. वांगी, कारली, ढब्बू, प्लॅावर, दोडका यांचे दहा किलोचे दर ४०० रुपयांवर आले आहेत. सरासरी निम्याने दर कमी झाले. कोंथिबिरीच्या १०० पेंढ्याचा दर ६०० रुपये झाला आहे. कोंथिबिरीचा किरकोळ बाजारात दहा रुपये पेंढी असा दर पूर्वपदावर आला आहे.
फळबाजारात संत्री, पेरू, सफरचंद यांची अधिक आवक आहे. संत्री, पेरू ६०- ८० तर सफरचंद ८० ते १०० रुपये किलो आहेत. केळी ३० ते ५० रुपये डझन आहेत. कर्नाटकातील तोतापुरी आंब्याची आवक कायम आहे. गुणे गल्लीत मिरची, कांदा, टोमॅटो यांच्या रोपांची आवक सुरू झाली आहे. उसाच्या लावणीत या रोपांची लागण केली जाते. ब्याळकूड (ता. चिक्‍कोडी) येथील दहाहून अधिक विक्रेते आले होते. रोपांच्या पेंढीचा दर २० ते ४० रुपयांपर्यंत होता.
-------------------
टोमॅटो, कोबी अधिक
भाजी मंडईत गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटो, कोबीच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरात दहा किलोमागे २५ ते ५० रुपयांनी दर कमी झाले आहेत. दहा किलोचा दर १०० ते १२५ रुपये आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात पंधरा रुपये किलो असा दर घसरला आहे.