धन्यवाद मोदीजी अभियानाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धन्यवाद मोदीजी अभियानाला प्रतिसाद
धन्यवाद मोदीजी अभियानाला प्रतिसाद

धन्यवाद मोदीजी अभियानाला प्रतिसाद

sakal_logo
By

gad134.jpg
62059
गडहिंग्लज : भारतीय जनता पार्टीतर्फे सुरू असलेल्या अभियान अंतर्गत जमा झालेली पत्रे सुभाष जाधव यांच्याकडे सुपूर्द करताना संदीप नाथबुवा, अनिल गायकवाड.
----------------------
धन्यवाद मोदीजी अभियानाला प्रतिसाद
गडहिंग्लज, ता. १३ : भारतीय जनता पार्टीतर्फे धन्यवाद मोदीजी हे अभियान सुरू आहे. या अभियानअंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी पत्रे लिहून दिली आहेत.
कोरोना काळात मोफत धान्य, गर्भवती महिलांना मातृवंदन योजना, किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्‍ज्वला गॅस योजना, ई-श्रम कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांनी पत्रे लिहून दिली आहेत. ही पत्रे एकत्रित करुन जिल्हा संयोजक सुभाष जाधव यांच्याकडे ती सुपूर्द केली. अनिल गायकवाड, संदीप नाथबुवा यांनी ही पत्रे दिली. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, सतीश हळदकर, संदीप रोटे, अमोल बिलावर, अर्चना रिंगणे, निलांबरी भुईंबर, कुमार पाटील, राजू रुद्रापगोळ, अनिल खोत, संग्राम हसबे, विठ्ठल भमाननगोळ, सुभाष चोथे, दिगंबर विटेकरी आदी उपस्थित होते.