डीकेएएससी महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेएएससी महाविद्यालयाचे यश
डीकेएएससी महाविद्यालयाचे यश

डीकेएएससी महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

62076
डीकेएएससी महाविद्यालयाचे यश
इचलकरंजी : जिल्हास्तरीय रेड रिबन क्लब आयोजित महाविद्यालयीन प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सीपीआर हॉस्पिटल आयोजीत जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे स्पर्धा महावीर कॉलेज येथे झाल्या. बीएस्‍सीच्या सौरभ सोनावळे व अनिकेत डोणे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. गतवर्षी महाविद्यालयाने सायबर कॉलेज येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. अरुण कटकोळे, आयजीएम रुग्णालयाच्या सौ. वाघमारे, सौ. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------
62077
व्यंकटेश महाविद्यालयात परिसंवाद
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात बी. कॉम आयटी विभागातर्फे एक दिवसीय परिसंवाद झाला. आयटी क्षेत्रात करिअर करायचे असल्यास संगणकाच्या विविध भाषा ज्ञात असणे गरजेचे आहे, असे मत सौ. सोनल खंजिरे यांनी व्यक्त केले. पहिल्या सत्रात श्रीमती अनुजा कामत यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यातील गरज ओळखून महाविद्यालयात बी. कॉम आयटी हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्‍व ओळखून हा अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि आपले करिअर घडवावे, असे आवाहन अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. विजय माने यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ. प्रदीप गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन एस. ए. होगाडे हिने केले. आभार एस. एम. वंजिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. व्ही. जगनाडे यांनी परिश्रम घेतले.
---------
62078
बालाजी विद्यालयात कार्यक्रम
इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये लिडरशीप प्रशिक्षण कार्यक्रम झाला. एमआर पै फौंडेशन मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जीवनातील ध्येय, संवाद कौशल्य, सवयी, स्वत:ला समजावून घेणे या व्यक्तिमत्त्‍व विकासाच्या कौशल्यावर दोन दिवस विवेक पत्की, राजीव लव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फौंडेशनमार्फत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे होते. फौंडेशनचे व्यवस्थापक कृष्णा देवाडिगा यांनी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. एम. एस. रावळ यांनी केले. आभार संदीप कोळी यांनी मानले. सायन्स विभागप्रमुख सौ. आर. एन. रिसवडे, कॉमर्स विभागप्रमुख कुमार कांबळे आदी उपस्थित होते.
-----------
62079
सर्वोदय विद्यालयात संविधान वर्ग
इचलकरंजी : मौलाना आझाद जन्म दिनानिमित्त सर्वोदय विद्यालय इंग्लिश मीडियममध्ये संविधान वर्ग सुरू केला. राष्ट्र सेवा दलातर्फे आझाद यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू केला. संवादक रोहित दळवी यांनी विद्यार्थ्यांशी आम्ही भारताचे लोक या विषयांतर्गत खेळ, गाणी, गप्पांच्या माध्यमातून संवाद साधला. मौलाना आझादांचे राष्ट्रनिर्माता हे पुस्तक विद्यार्थ्यांना गौरी कोळेकर हिने भेट दिले. उपक्रमासाठी इस्माईल समडोळे, सौ. समडोळे, श्रीमती सगरे आदींचे सहकार्य लाभले.
--------
62080
अनाथ मुलांसमवेत वाढदिवस
इचलकरंजी : येथील वेदांत चौगुले या चिमुकल्याचा पहिला वाढदिवस कुटुंबीयांनी अनाथ मुलांसमवेत साजरा केला. मुलाच्या पहिल्याच जन्मदिनी सामाजिक सलोखा जपत अभिजित चौगुले याने विधायक पायंडा पाडला. मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या वारेमाप खर्चाला फाटा देत विद्यार्थी विकास प्रबोधिनी अब्दुललाट येथे वाढदिवस साजरा केला. मुलांना खाऊ वाटप करून संस्थेस लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तू दिल्या. यावेळी सौ. नयना चौगुले, जयश्री सुतार, सुरेश कारदगे, अभिजित चव्हाण, उत्तम चौगुले आदी उपस्थित होते.
--------
62082
नाईट कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक दिवस
इचलकरंजी : नाईट कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक दिवस झाला. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुलकलाम आझाद यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. महाविद्यालयात डॉ. आझाद यांच्या जीवनावर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले. तसेच वाद विवाद स्पर्धाही झाल्या. डॉ. सबिहा सय्यद याने आझाद यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबाबत माहिती दिली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरंदर नारे होते. कार्यक्रमाचे आयोजन ऊर्दू विभागातर्फे केले.
-------
आंतरभारती विद्यालयात विद्यार्थी दिवस
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयात राष्ट्रीय विद्यार्थी दिवस झाला. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. सांस्कृतिक विभागप्रमुख एन. बी. कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एम. डी. पाटील यांनी केले. पूर्वा चौगुले हिने संविधानाचे वाचन केले. जुईली पाटील हिने मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते एस. एल. जाधव यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सौ. व्ही. सी. फाटक, जिमखाना विभागप्रमुख आर. बी. परीट आदी उपस्थित होते.