लोक अदालतीमध्ये ५७ प्रकरणांत तडजोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोक अदालतीमध्ये ५७ प्रकरणांत तडजोड
लोक अदालतीमध्ये ५७ प्रकरणांत तडजोड

लोक अदालतीमध्ये ५७ प्रकरणांत तडजोड

sakal_logo
By

GAD135.JPG
गडहिंग्लज : न्यायाधीश व वकीलांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक अदालतीत ५७ प्रकरणांमध्ये तडजोडीची प्रक्रिया झाली.
-------------------------------------------------------------------------
लोक अदालतीमध्ये
५७ प्रकरणांत तडजोड
एक कोटी रक्कम वसूल : तीन पॅनेलद्वारे तडजोडीची प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५७ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. त्यातून १ कोटी १३ हजार रक्कमेची वसूली झाली. तीन पॅनेलद्वारे तडजोडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
जिल्हा न्यायाधीश ए. आर. उबाळे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश जी. व्ही. देशपांडे, कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश एम. टी. खराडे असे तीन पॅनेल होते. न्या. उबाळे यांच्यासमोर ८, न्या. देशपांडे यांच्यासमोर ३२ तर न्या. खराडे यांच्यासमोर १७ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. न्यायप्रविष्ठ व दाखलपूर्व प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. पक्षकार, वकीलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध फायनान्स कंपन्या, विमा कंपन्या, पोलिस दंड, संपादीत जमीन भरपाई आदी न्यायप्रविष्ठ व दाखलपूर्व प्रकरणातून चांगली रक्कमही वसूल झाल्याचे सांगण्यात आले.
अ‍ॅड. रेहाना म्हाबर्जी, अ‍ॅड. राजश्री नांदवडेकर, अ‍ॅड. संगीता पटील, सहायक अधीक्षक संजय साळुंखे, ए. ए. पाटील, सुधा तांबवेकर, दिपक चौगुले, एस. आर. कांबळे, रवींद्र घायतडक, आनंदा वणीरे, एस. एस. उंडाळे, प्रदीप चौगले, सचिन पाटील, मदन करपे, राहूल कल्याणकर, सौ. एम. व्ही. भिलारे, अवधूत घेवडे, सुनिल कांबळे यांच्यासह पक्षकार, वकीलांचेही सहकार्य मिळाले.