बुद्धीमतेचा वापर व्यवहारी जीवनात आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धीमतेचा वापर व्यवहारी जीवनात आवश्यक
बुद्धीमतेचा वापर व्यवहारी जीवनात आवश्यक

बुद्धीमतेचा वापर व्यवहारी जीवनात आवश्यक

sakal_logo
By

ajr132.jpg
देवर्डे (ता. आजरा) ः बी. सी. गुरव विजेत्यांचा सत्कार करताना. उपस्थित सुभाष सावंत व मान्यवर.
--------
बुद्धिमतेचा वापर व्यवहारी जीवनात आवश्यक
डॉ. मारुती डेळेकर; देवर्डेत विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः बुद्धिमतेचा वापर व्यवहारी जीवनात समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे. अन्यथा तो चुकीच्याही गोष्टीसाठी होऊ शकतो. युवकांनी नेहमी सामाजिक भूमिका ठेवून काम करावे, असे आवाहन डॉ. मारुती डेळेकर यांनी केले.
देवर्डे (ता. आजरा) येथील प्राथमिक विद्यामंदिरात माझा गाव, माझा अभिमान ग्रुपतर्फे रणजित भादवणकर यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार झाला. रवळनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष सावंत अध्यक्षस्थानी होते. ग्रुपतर्फे चित्रकला, रांगोळी व किल्ला स्पर्धा झाल्या. त्याचबरोबर आरोग्य शिबिर झाले. शिबिरात ३०० जणांची तपासणी केली. पावणे चार लाख रुपये किमतीच्या औषधांचे वाटप केले. रक्तदान शिबिरालाही प्रतिसाद मिळाला. गटशिक्षणाधिकारी बी. सी. गुरव, विस्तार अधिकारी विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
विजेते अनुक्रमे असे - चित्रकला स्पर्धाः पहिली ते दुसरी गट- आदर्श चाळके, स्नेहल तानवडे, आरोही पाटील. तिसरी ते चौथी गट - समृद्धी भादवणकर, कस्तुरी जाधव, रुद्र नालंग. पाचवी ते सातवी गट - श्रेयस तानवडे, नंदिनी पाटील, सायली कांबळे. आठवी ते दहावी गट - हर्षवर्धन लोहार, सोहम बागडी, कौस्तुभ चाळके. रांगोळी स्पर्धा - दर्शना भादवणकर, उषा पाटील, पल्ली तानवडे. किल्ला स्पर्धा- नवयुवक मित्र मंडळ, अनिकेत सोले, आयुष पाटील (विभागून), करण ढोकरे व अर्जुन ढोकरे. मुख्याध्यापक नामदेव माईनकर, चंद्रकांत घुरे, महेश नावलगी, संयोगिता सुतार, सरोजिनी कुंभार, महादेव तेजम, रेश्मा बोलके, वंदना चव्हाण, ज्ञानदेव चाळके आदी उपस्थित होते. प्रथमेश मळेकर, शुभम बुरुड, समर्थ बुरुड, अक्षय जाधव, शरद चाळके, विकास मळेकर, प्रतीक इक्के, सिध्दार्थ मोरे, संकेत सोले, कुणाल बागडी आदींनी नियोजन केले.