सौंदती यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदती यात्रा
सौंदती यात्रा

सौंदती यात्रा

sakal_logo
By

`सौंदत्ती’साठी तीन दिवसांचे
भाडे घेण्याचा निर्णय रद्द

राजेश क्षीरसागर : जाता-येताचे ३७० किलोमीटरचेच भाडे घेणार

कोल्हापूर, ता. १३ ः सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीकडून तीन दिवसांचे भाडे घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. या निर्णयाने भाविकांना फक्त जाता- येताचे ३७० किलोमीटरचेच भाडे द्यावे लागणार आहे.
यापूर्वी या यात्रेसाठीचा खोळंबा आकार पूर्ण माफ केला आहे. पण या वर्षी एस.टी. महामंडळाने एसटी भाड्यापोटी ३७० किलोमीटरने तीन दिवसांचे भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाडे प्रति किलोमीटर ५४ रुपये धरले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भक्तांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार होता. याविषयी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ परिवहन आयुक्त शेखर चेन्ने यांना फोन करून आदेश दिले. त्यानुसार तीन दिवसांच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविकांच्याकडून आता ३७० किलोमीटरचे भाडे आकारणी होणार आहे. त्यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे.
सौंदत्ती यात्रा ८ डिसेंबर रोजी होत आहे. कोल्हापुरातून या यात्रेसाठी लाखो भाविक जातात. त्यासाठी तीन दिवस एसटीचे आरक्षण केले जाते. या निर्णयाने भाविकांतही समाधान व्यक्त होत आहे. एसटीने तीन दिवसांची भाडे आकारणी सुरू केली. त्यामुळे ३७० किलोमीटरप्रमाणे तीन दिवसांचे १,११० किलोमीटरची भाडे आकारणी केली जात होती. या तीन दिवसांचे भाडे ६० हजार रुपये होत होते. नव्या निर्णयाने हे भाडे २० हजार होईल.
............