इचल : वाहतूक शाखा वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : वाहतूक शाखा वसुली
इचल : वाहतूक शाखा वसुली

इचल : वाहतूक शाखा वसुली

sakal_logo
By

ich137.txt

मटक्यांच्या नव्हे, त्या दंडाच्या चिठ्ठया
इचलकरंजीत संतापः वाहतूक कर्मचार्‍या कडून चिट्ठीद्वारे वसुली

इचलकरंजी, ता.२४ ः इचलकरंजी शहरास सध्या वाहतूक कोंडी, अस्थाव्यस्त पार्किंग, कर्णकर्कश हॉर्न, सुसाट ड्रायव्हिंग आदी समस्याने ग्रासले आहे. वाहतूक शाखा केवळ बंदोबस्तात व्यस्तचे कारण देत पळवाट काढत आहे. एकीकडे शहराच्या वेशीवर उभे राहून कांही कर्मचारी दंडाची वसूली चिट्ठीद्वारे स्वत:च्या गूगल पे वर करून घेतांना दिसतात. वाहनधारकांना होणार्‍या दंड रक्कमेच्या पावत्या देण्याऐवजी मटक्याच्या चिठ्याप्रमाणे छोट्या-छोट्या चिटकोऱ्या पावत्या देण्यात येत आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत की कर्मचार्‍याच्या खात्यात असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
इचलकरंजी या वस्त्र नागरीत मालवाहतुक करणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. सोबत मोटर सायकलींची संख्या ही मोठी असल्याने शहरात वरचेवर वाहतूक कोंडी दिसते. येथे अनेक ठिकाणी मार्गावरच वाहन पार्किंग होते. अशा अनेक वाहतुक समस्याशी शहर झगडत असताना वाहतूक शाखेतील अधिकतर कर्मचारी मात्र शहराच्या वेशीवर बंदोबस्ताला पसंती देतात. यामागचे गोडबंगाल काय? याचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. येथे कारवाईबाबत अनेक वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. दंड आकारणीची मोठी रक्कम सांगून तडजोड होत असल्याचे वाहनधारकांमधून सांगण्यात येते.
शहरात येणार्‍या टेम्पो चालक, वडाप व्यवसायीक वाहन धारकाकडून महिन्याकाठी ठराविक रक्कम निर्धारित केली आहे. ही घेतल्या नंतर त्यांना विशिष्ट स्वरूपाच्या चिठ्ठ्या देण्यात येतात. यामध्ये गाडी नंबर, तारीख, सही असते. शहरातील नदीवेस नाका, यड्राव-खोतवाडी फाटा, पंचगंगा कारखाना अशा मोक्याच्या ठिकाणी वाहनधारकांकडून कागदपत्रांची मागणी केली जाते. कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास विविध कलमांचा पाडा वाचून अव्वाच्या सव्वा दंडाची भीती दाखवली जाते. यानंतर तडजोड करण्यात येते.

उडवा उडवीची उत्तरे
सध्या तर काही कर्मचारी स्वत:च्या खाजगी बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याचा आग्रह करीत आहेत. याबाबत कर्मचार्‍यास विचारले असता माझे वायक्तिक पैसे आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. मात्र या प्रकारामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून वरिष्ठ अधिकार्‍यांचा वाचक नसल्यांने दिसते. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
-----------

तडजोड न झाल्यास दंड
इचलकरंजी शहरामध्ये काही वाहतूक शाखेतील कर्मचारी वाहनधारकांना दंड करतात. पण हा दंड अधिकतर तडजोड न झाल्याने झालेला असतो. तर वाहनधारक कोणत्याही राजकीय नेत्याची ओळख सांगेत असेल तर कर्मचारी ऑनलाइन दंड करीत आपला चतुरपणा दाखवून देत आहेत. मात्र यामध्ये तडजोड न झालेला राग दिसून येतो.
----------
असे प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांकडून होत नाहीत. तरीही या प्रकरणाची शहनिशा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
-विकास अडसूळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, इचलकरंजी