मेन राजाराम स्थलांतराबाबत लोकभावनेचा विचार करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजाराम स्थलांतराबाबत लोकभावनेचा विचार करणार
मेन राजाराम स्थलांतराबाबत लोकभावनेचा विचार करणार

मेन राजाराम स्थलांतराबाबत लोकभावनेचा विचार करणार

sakal_logo
By

लोगो....
.....

‘मेन राजाराम’बाबत
लोकभावनेचा विचार करणार

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील : आज मुंबईत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलच्या संभाव्य स्थलांतरामध्ये लोक भावनेचा विचार करावा लागेल आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून तो केला जाईल. उद्या (ता. १४) मुंबईमध्ये मेन राजाराम हायस्कूलच्या संभाव्य स्थलांतराबाबत केसरकर यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर होऊ नये, यासाठी जनमानसातून विरोध होत आहे. सर्वपक्षीय पातळीवरही हे स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्य शासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपली भूमिका आज स्पष्ट केली.
पाटील म्हणाले, ‘‘मेन राजाराम हायस्कूल स्थलांतराबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अद्यापही कोणता निर्णय घेतलेला नाही. ही ऐतिहासिक वास्तू आहे. ज्या कारणासाठी याचा वापर करायला हवा, त्यासाठीच त्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या लोकभावनेचा विचार करावा लागेल. केसरकर लोकभावनेविरुद्ध कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणार नाहीत. त्यांचा तो स्वभावच नाही. दरम्यान, उद्या मुंबईत आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत. त्यावेळी एकमेकांशी जोडलेल्या सर्व विषयांवर चर्चा होईल. यामध्ये मेन राजाराम हायस्कूलबद्दलही चर्चा केली जाईल. मेन राजारामही ऐतिहासिक वास्तू आहे. त्याचा योग्य व ठरलेल्या कारणासाठीच वापर केला पाहिजे. पालकमंत्री केसरकर यांचा लोक भावनेचा अनादर करण्याचा स्वभाव नाही. त्यामुळे मेन राजारामबाबत निश्‍चितपणे ते सकारात्मक भूमिका घेतील.’’