नाट्य लेखन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य लेखन स्पर्धा
नाट्य लेखन स्पर्धा

नाट्य लेखन स्पर्धा

sakal_logo
By

नाट्य लेखन स्पर्धेसाठी मुदतवाढ
कोल्हापूर ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील नाट्यलेखन स्पर्धेसाठी संहिता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर ही अखेरची तारीख होती. मात्र, लेखकांच्या आग्रही मागणीमुळे मुदत वाढविण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत लेखकांना संहिता पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी केले आहे.
-------------
62181
संजय कांबळे
संजय कांबळे यांना पदोन्नती
कोल्हापूर ः येथील दत्त भागिरथीनगर येथील संजय पांडुरंग कांबळे यांची भारत संचार निगम (बीएसएनएल)च्या कर्नाटकातील हुबळी येथील कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल) पदावर पदोन्नती झाली. यापूर्वी ते उपविभागीय अभियंता (इलेक्ट्रीकल) पदावर कार्यरत होते. पदोन्नतीनंतर धारवाड, दावणगेरे, बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, बिदर, रायचूर आणि बेल्लारी हे जिल्हे त्यांच्या कार्यक्षेत्राखाली असणार आहेत.