फेमस ग्रुपतर्फे ब्लॅकेंटचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेमस ग्रुपतर्फे ब्लॅकेंटचे वाटप
फेमस ग्रुपतर्फे ब्लॅकेंटचे वाटप

फेमस ग्रुपतर्फे ब्लॅकेंटचे वाटप

sakal_logo
By

62203
कोल्हापूर ः फेमस ग्रुपतर्फे शहरातील फिरस्ते, गरीब लोकांना ब्लॅकेंटचे वाटप करताना केवलसिंग रजपूत आदी.

प्रयाग चिखलीच्या फेमस ग्रुपतर्फे
कोल्हापूरमध्ये ब्लॅकेंटचे वाटप
प्रयाग चिखली, ता. १४ : कोल्हापूर शहरातील गरीब, फिरस्त्यांना झोपलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या अंगावर मायेची ऊब व थंडीपासून बचावासाठी येथील फेमस ग्रुपतर्फे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. रंकाळा स्टॅंडपासून ब्लॅंकेट वाटपास सुरवात झाली. भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर, शाहूपुरी, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅंड, कावळा नाका, टेंबलाई नाका, सीपीआर हॅास्पिटल, दसरा चौक, बिंदू चौक येथे फूटपाथवर, रस्त्यावर थंडीत कुडकुडत झोपले होते. त्यांना ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ब्लॅकेंट देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गरजेप्रमाणे आर्थिक मदत केली.
५२ फिरस्ते व गरिबांना ब्लॅकेंट वाटप करण्यात आले. चिखलीचे माजी सरपंच केवलसिंग रजपूत यांच्या पुढाकारातून शुभम बागडी, प्रथमेश मांगलेकर, सनी पाटील, सार्थक यादव, सागर मांगलेकर, विनायक पिसाळ, आकाश पाटील, केदार रजपूत, नितीश यादव, अनिकेत पाटील, प्रसाद पिसाळ, प्रथमेश पिसाळ, शिवतेज यादव यांनी परिश्रम घेतले. नाना पाटील, पपूसिंग रजपूत, गणेश माने, भारत रजपूत, झंबा पाटील, कुंडलिक यादव, शिवाजी मांगलेकर, शंकर यादव, किरण माने, रामा पाटील, एकनाथ यादव, जालींदर शिंदे, विलास पिसाळ, आबासो पाटील, दीपक मस्कर, जावेद मुजावर यांचे सहकार्य लाभले.