कोल्हापूरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरात
कोल्हापूरात

कोल्हापूरात

sakal_logo
By

६२२०६ , ६२२०७
तरुणाचा पाठलाग करून खून
पूर्ववैमन्यस्यातून दहा जणांकडून हल्ला
कोल्हापूर, ता. १३ : राजेंद्रनगर येथील तरुणाचा पाठलाग करत आठ ते दहा जणांनी निर्घृण खून केला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात धारदार शस्त्राने १५ ते १७ वार करून हल्लेखोर पसार झाले. कावळा नाका ते रेल्वे उड्डाणपूलदरम्यान रात्री अकराच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कुमार शाहूराज गायकवाड (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुमार हा रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले. कुमार त्याचा मामा त्र्यंबक गवळी यांच्यासोबत एका मॉलमध्ये आला होता. तेथून त्याला आठ ते दहा जणांनी अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून हल्ला केला. त्यानंतर त्याचा मामा गवळी यांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याने कुमार याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी सीपीआरच्या आवारात गर्दी करत आक्रोश केला. दरम्यान, या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळ व सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्रनगर येथील शिवाजी चव्हाण सभागृहामागे कुमार गायकवाड राहतो. एका मॉल परिसरातील रस्त्यावर रात्री हाती धारदार शस्त्र असलेल्या आठ ते दहा जणांनी कुमारचा पाठलाग केला. दुचाकीवर असणाऱ्या कुमारला अर्धा किलोमीटर अंतरावर गाठल्यानंतर तरुणांनी त्याच्या शरीरावर १५ ते १७ वार केले. यातच तो रक्‍त्याच्या थारोळ्यात पडला. कुमारच्या मागूनच त्याचा मामा श्री. गवळी आले. गवळी यांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. मात्र, उपचारादरम्यानच कुमारचा मृत्यू झाला. ही माहिती समजताच राजेंद्रनगरमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांचा फौजफाटा या सर्व परिसरामध्ये तैनात करण्यात आला. सीपीआरमध्येही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

* कुटुंबीयांचा आरोप :
सीपीआरमध्ये कुमारच्या नातेवाईकांनी अमर, बाळू आणि जोकर नावाच्या तरुणांनीच कुमारचा घात केल्याचा आरोप केला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही कुमारच्या मित्रांनी केली.


केजी कंपनी म्हणून वावर
* केजी कंपनी म्हणून राजेंद्रनगर येथे कुमार गायकवाडचा वावर होता. सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह असणाऱ्या कुमारने परिसरात आपला दबदबा निर्माण केल्याचे दिसून येते.