गायरान अतिक्रमणे नियमित करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायरान अतिक्रमणे नियमित करा
गायरान अतिक्रमणे नियमित करा

गायरान अतिक्रमणे नियमित करा

sakal_logo
By

ich141.jpg
62267
इचलकरंजी : प्रांत कार्यालयाबाहेर गायरान अतिक्रमणे कायदेशीर करून नियमित करावीत या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
-------------
गायरान अतिक्रमणे नियमित करा
इचलकरंजी कृती समितीतर्फे मोर्चा; निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
इचलकरंजी, ता. १४ : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायदेशीर करून नियमित करावीत या मागणीसाठी अतिक्रमण बचाव संघर्ष कृती समितीतर्फे मोर्चा काढून मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयामध्ये शिरस्तेदार संजय काटकर यांना दिले. या वेळी निदर्शने करीत अतिक्रमणाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अतिक्रमण नियमित न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदनात उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. अधिकतर अतिक्रमणधारक हे पूरग्रस्त तसेच भूमिहिन, शेतमजूर, मागासवर्गीय तसेच बेघर गरीब लोक आहेत. अनेक लोकांचे संसार उद्‍ध्वस्त होऊन फार मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायदेशीर करून नियमित करावीत किंवा त्या मिळकतधारकांचे अतिक्रमीत मिळकत त्यांच्या नावे करावी, असे नमूद केले आहे. शिष्टमंडळात सुरेश सासणे, भाऊसाहेब कसबे, पी. बी. गायकवाड, संजय टेके, रोहित गोसावी, मच्छिंद्र कांबळे, शाहणाबाई जाधव, चंद्रकांत करंगळे, सुभाष उलस्वार, कुमार पाटील, कलंदर सनदी, अक्काताई तेली, दिगंबर सकट, संदीप बिरणगे, बाबासाहेब नदाफ, आप्पासो बंडगर, सुरगोंडा पाटील आदी सहभागी झाले होते.