शरद पॅटर्न अस्तित्वाची जाणीव करून देते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पॅटर्न अस्तित्वाची जाणीव करून देते
शरद पॅटर्न अस्तित्वाची जाणीव करून देते

शरद पॅटर्न अस्तित्वाची जाणीव करून देते

sakal_logo
By

62285
--------------
शरद पॅटर्न अस्तित्वाची जाणीव करून देते
अनिल बागणे : अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
दानोळी, ता. १४ ः विद्यार्थ्यांना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा पॅटर्न म्हणजे शरद पॅटर्न आहे. या पॅटर्नमध्ये शिक्षण, उद्योग व संस्काराची मंदिरे उभी आहेत. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वीतेसाठी शॉर्टकट नाही, प्रामाणिकपणा व प्रचंड कष्ट आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वातील नम्रता हे गुण अंगीकारला, तर यश हमखास मिळतं, असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.
ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, अॅक्टिव्हिटी प्रोग्रॅम, प्रोडक्शन सेंटर याच्यासोबत २८ प्रकारचे अद्ययावत कौशल्ये उपलब्ध आहेत. ज्याचा उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे.’
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, विभागप्रमुख यांनी महाविद्यालय व विभागाची माहिती दिली. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. उपप्राचार्या सौ. एस. पी. कुर्लेकर आदी उपस्थित होते. प्रा. स्मिता कोरे यांनी स्वागत केले. डॉ. शीतल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उमेश सिध्दार्थ यानी आभार मानले.