कौलगेत झाले पाचवे नेत्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौलगेत झाले पाचवे नेत्रदान
कौलगेत झाले पाचवे नेत्रदान

कौलगेत झाले पाचवे नेत्रदान

sakal_logo
By

gad144.jpg :
62293
विमल पोवार
------------------------
कौलगेत झाले पाचवे नेत्रदान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील विमल महादेव पोवार (वय ६७) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. चळवळीतील हे ८२ वे नेत्रदान ठरले. कौलगेत सात महिन्यांत तिसरे तर एकूण पाचवे नेत्रदान झाले. पोवार कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत हा आदर्शवत निर्णय घेतला.
विमल पोवार दोन दिवसांपासून आजारी होत्या. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले. चळवळीतील कार्यकर्त्यांनी नेत्रदानाबाबत विचारणा केल्यानंतर पोवार कुटुंबीयांनी त्यास संमती दर्शवली. त्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाला पाचारण केले. पथकाने नेत्रगोल घेण्याची प्रक्रिया केली. विमल यांच्या मागे पती, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १६) आहे.
कौलगेत पाच वर्षांपूर्वी नेत्रदान चळवळीचा प्रारंभ झाला. सुरुवातीच्या दोन वर्षांत दोन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले होते. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावामुळे पुढील दोन वर्षे काम ठप्प झाले होते. त्यानंतर गावात चळवळीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. सात महिन्यांत तीन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.