शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात
शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात

शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात

sakal_logo
By

gad147.jpg
62299
गडहिंग्लज : बालदिनानिमित्त शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ सुपूर्द करताना संभाजी चव्हाण. शेजारी पालक व शिक्षक.
----------
गडहिंग्लजमध्ये बालदिन उत्साहात

गडहिंग्लज, ता. १४ : गडहिंग्लजसह परिसरात बालदिन बाल दिन उत्साहात साजरा केला. येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय अनुष्का पाटील, प्रणव पाटील, सई पाटील या विद्यार्थ्यांनी करून दिला. शालेय मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री सारंग कुलकर्णी व सर्व शालेय मंत्रिमंडळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समूहगीत, गोष्टी, गाणी, नकला व विविध खेळांचे प्रदर्शन केले. चव्हाण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप झाले. विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.
----------
किलबिल विद्यामंदीर
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्यामंदिर व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी केली. मुख्याध्यापक आनंदा घोलराखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. संस्थाध्यक्ष सौ. अंजली हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक घोलराखे, शहजादी पटेल आदी उपस्थित होते.
---------------------------------------------

जागृती हायस्कूल
जागृती हायस्कूल व आर. के. ज्युनिअर कॉलेजमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी केली. प्राचार्य विजयकुमार चौगुले यांच्याहस्ते नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. श्री. चौगुले यांनी पहिले पंतप्रधान म्हणून नेहरु यांनी केलेली देशाची प्रगती आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रा. सुरेश घस्ती यांनी स्वागत केले. उपप्राचार्य अनिता पाटील, एस. बी. अनावरे आदी उपस्थित होते. डी. डी. वरोटे, आय. एस. मरडी यांनी संयोजन केले. प्रा. विजय काळे यांनी आभार मानले.
----------------------
क्रिएटीव्ह हायस्कूल
क्रिएटीव्ह हायस्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन केले. मुख्याध्यापक दिनकर रायकर अध्यक्षस्थानी होते. वैशाली चराटी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. रायकर यांनी नेहरुजींच्या कार्याचा आढावा घेतला. सौ. एस. डी. रावण यांनी आभार मानले.
---------------------------------
न्यू होरायझन स्कूल
न्यू होरायझन स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. नृत्य व एकांकिकेचे सादरीकरण केले. बालदिनानिमित्त पतंग स्पर्धा झाली.
------------------
सह्याद्री विद्यालय
चंदगड : हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालयात बाल दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य यू. एल. पवार होते. त्यांच्याहस्ते भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्य पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. व्ही. आर. मोहनगेकर आदी उपस्थित होते.
------------------
नेसरी हायस्कूल
नेसरी : पंडित जवाहरलाल नेहरूंचे देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन प्रा. संजय पाटील यांनी केले. येथील एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये बालदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य अमृत लोहार अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य लोहार, उपप्राचार्य आय. टी. नाईक, शालेय मंत्रिमंडळ सदस्य यांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन झाले.
-------------
व्यंकटराव हायस्कूल
आजरा ः येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा झाला. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. माजी प्राचार्य व संचालक सुनिल देसाई, संचालक सचिन शिंपी, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. ए. मोरे आदी उपस्थित होते.