शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात
शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात

शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात

sakal_logo
By

gad147.jpg
62299
गडहिंग्लज : बालदिनानिमित्त शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ सुपूर्द करताना संभाजी चव्हाण. शेजारी पालक व शिक्षक.
----------------------------------------------------
शिवाजी विद्यालयात
बाल दिन उत्साहात
गडहिंग्लज, ता. १४ : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात बाल दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थी प्रतिनिधी ऋग्वेदा जाधव अध्यक्षस्थानी होती. टाटा लाईफ इन्शुरन्सचे संभाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय अनुष्का पाटील, प्रणव पाटील, सई पाटील या विद्यार्थ्यांनी करून दिला. शालेय मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री सारंग कुलकर्णी व सर्व शालेय मंत्रिमंडळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समूहगीत, गोष्टी, गाणी, नकला व विविध खेळांचे प्रदर्शन केले. चव्हाण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप झाले. विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापक पी. व्ही. शिलेदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अथर्व देसाई, धनराज डांग या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. विजय मोहिते यांनी स्वागत केले. संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे व सचिव उर्मिलादेवी शिंदे यांनी बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बालवाडीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल राजर्षी शाहू उद्यानात नेण्यात आली. चिमुकल्यांनी या उद्यानात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.