यिन बालदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन बालदिन
यिन बालदिन

यिन बालदिन

sakal_logo
By

62343
कोल्हापूर : नूतन बाल मंदिरात ‘यिन’च्या तरुणाईने मुलांसोबत केक कापून बाल दिन साजरा केला.

यिनच्या सदस्यांनी केले
मुलांसोबत सेलिब्रेशन
कोल्हापूर, ता. १४ : भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यिन’ व्यासपीठातर्फे नूतन बाल मंदिरात तरुणाईने लहान मुलांसोबत आनंदोत्सव साजरा केला. बाल मंदिरातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यासोबतच त्यांना अल्पोपहार देत छोटेसे सेलिब्रेशन रंगले.
प्राथमिक शाळेतील बालवाडी, पहिली, दुसरीच्या वर्गातील मुलांनीही या उपक्रमाचा आनंद घेतला. यिनच्या सदस्यांनी पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर हे शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर हात उंचावून आनंद व्यक्त केला. त्यानंतर खाऊचे वाटप केले.
यिनच्या सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत मुख्याध्यापिका वर्षाराणी वायदंडे, सुनीता जाधव व शिवानी पाटील यांनी कौतुक केले. या वेळी बाल मंदिराचे डी. ए. शिंदे, पल्लवी कुलकर्णी, अनुराधा दीक्षित व ए. डी. पाटील उपस्थित होते. यिनचे मुख्यमंत्री पार्थ देसाई, यिन महापौर ऋतुजा पाटील, यिनचे अध्यक्ष राजलक्ष्मी कदम, ओमकार रसाळ, ओमकार साठे, पौर्णिमा सूर्यवंशी, कोअर टिममधील सदस्य सई साळोखे, तानिया मुरसल, साक्षी शिंगे, शिवानी नागराळे, स्नेहल परीट, तिर्था मोळे, श्रेया चौगुले, चेतना रांगी, आदित्य आडे, सौरभ फोगडे, हर्षदा कदम, प्रणव साळोखे, श्‍वेता कुंभार, स्वप्नाली पाटील उपस्थित होते. ‘यिन’चे विभागीय सहायक व्यवस्थापक अवधुत गायकवाड यांनी संयोजन केले.
-----------
आदर्श प्रशाला
सानेगुरुजी वसाहत : जुना वाशी नाका, सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत बाल दिन साजरा झाला. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डी. पी. सुतार म्हणाले, ‘‘पालक, शिक्षक व समाजातील इतर व्यक्तींनीही मुलांना समजून घेतले पाहिजे. तसेच मुलांना आपला वेळही दिला पाहिजे.’’ एस. एस . शिंदे यांनी आभार मानले.