इचल : अपघात एसटीचालक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : अपघात एसटीचालक ठार
इचल : अपघात एसटीचालक ठार

इचल : अपघात एसटीचालक ठार

sakal_logo
By

4916
फोटो - सुनील माने
.........

शहापूर आगारात बसच्या
धडकेत एसटीचालक ठार
इचलकरंजी, ता. १४ : एसटीच्या येथील शहापूर आगारात आज पहाटे झालेल्या अपघातात एका एसटी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील कृष्णा माने (वय ४५, रा. कोरोची, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी अन्य एक एसटी चालक सचिन शंकर कोकरे (मूळ रा. कोयनानगर, जि. सातारा) यांच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माने समोरून चालत येत होते. त्याचवेळी कोकरे एसटी बस घेऊन आगारातून बाहेर जात होते. यावेळी एसटी बसची माने यांना जोरात धडक बसली. यामध्ये माने यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः इचलकरंजी आगाराच्या गाड्या विविध बसस्थानकांतून फिरून आल्यानंतर शहापूर आगारात थांबतात. पहाटेपासून पुन्हा ठरलेल्या मार्गावर निघतात. पहाटे पाचच्या सुमारास कोकरे दानवाड येथे जाण्यासाठी आगारात (एम.एच. 0७, सी ७३५३) बसची प्राथमिक चाचणी घेत होते, तर चालक माने मार्गावरील एसटी वेळापत्रकाची माहिती घेऊन एसटीकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या कोकरे यांच्या एसटीने त्यांना जोराची धडक दिली. धडकेत माने जमिनीवर कोसळत डोक्यावर आपटले. त्यांना त्वरित आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहतूक नियंत्रक दीपक सातपुते यांच्या फिर्यादीनुसार कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. रुग्णालयात नातेवाईक, चालक-वाहक यांनी मोठी गर्दी केली होती.

शरीरसौष्ठवपटू
मृत माने यांच्यावर काळाने घाला घातला. ते, महामंडळात लोकप्रिय होते. अंगाने धष्टपुष्ट असणाऱ्या माने यांनी महामंडळाच्या प्रत्येक शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक पारितोषिके जिंकली होती. एक तगडा चालक गेल्याने एसटी वाहक व चालकांनी हळहळ व्यक्त केली.