संकेश्‍वर-बांदा महामार्गाबाबत शुक्रवारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकेश्‍वर-बांदा 
महामार्गाबाबत
शुक्रवारी बैठक
संकेश्‍वर-बांदा महामार्गाबाबत शुक्रवारी बैठक

संकेश्‍वर-बांदा महामार्गाबाबत शुक्रवारी बैठक

sakal_logo
By

संकेश्‍वर-बांदा
महामार्गाबाबत
शुक्रवारी बैठक
आजरा ः संकेश्‍वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी, नागरिक व छोटे व्यापारी यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी बैठक आयोजित केली आहे. येथील तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता बैठक होईल. याबाबतचे पत्र बारवे यांनी दिल्याची माहिती आंदोलनाचे समन्वयक संपत देसाई यांनी दिली. किसान भवनात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा झाला होता. मेळाव्यानंतर शिष्टमंडळाने बारवे यांची भेट घेऊन तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याविषयी मागणी केली होती. आज त्याबाबतचे पत्र दिल्याचे देसाई यांनी सांगितले.