अर्बन बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक
अर्बन बँक

अर्बन बँक

sakal_logo
By

अर्बन बँकेचा आज फैसला

४० टेबलवर मतमोजणी ः दुपारपर्यंत कल स्पष्ट होणार

कोल्हापूर, ता. १४ ः येथील कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. १५) रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून होत आहे. प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे ४० टेबलवर ही मोजणी होईल. दोन फेऱ्यात मोजणी संपणार असून पहिल्या फेरीतच निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १३) चुरशीने ४८ टक्के मतदान झाले आहे. संचालकपदाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून ३५ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण २८ हजार ९८३ मतदारांपैकी १३ हजार ७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर शहरासह गोकुळ शिरगांव, बालिंगा, आंबेवाडी, कळंबा, उचगांव, पुणे व रत्नागिरी येथील ५२ केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीत सत्तारूढ कणेरकर-शिंदे पॅनेल विरुद्ध भास्करराव जाधव पॅनेल अशी लढत आहे. विरोधी पॅनेलमध्ये दोन विद्यमान संचालक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती.
मतमोजणीसाठी ४० टेबलवर प्रत्येकी ३ याप्रमाणे १२० तर राखीव ३० अशा १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत एक ते ४० मतदान केंद्रांवरील सर्व गटांची मतमोजणी होईल. त्यानंतर उर्वरित १२ केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे काम पहात आहेत, त्यांना उदय उलपे सहकार्य करत आहेत.
............