मेन राजाराम -नगर भूमापनमध्ये कागदांचा शोध सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजाराम -नगर भूमापनमध्ये कागदांचा शोध सुरु
मेन राजाराम -नगर भूमापनमध्ये कागदांचा शोध सुरु

मेन राजाराम -नगर भूमापनमध्ये कागदांचा शोध सुरु

sakal_logo
By

(चला वाचवूया मेन राजाराम)

मालमत्ता जि.प.च्या नावे
करण्याच्या अर्जांचे पुढे काय?

माजी विद्यार्थ्यांची विचारणा; ‘नगरभूमापन’मध्ये कागदांचा शोध


कोल्‍हापूर, ता. १४ : ऐतिहासिक मेन राजाराम हायस्‍कूलची मालमत्ता जिल्‍हा परिषदेच्या नावे करण्याबाबत अनेक वेळा नगरभूमापन विभागाकडे अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांचे काय झाले, याची विचारणा हायस्‍कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व पा‍श्‍वभूमीवर नगरभूमापन कार्यालयाने कागदपत्रांचा शोध सुरु केला आहे. दोन दिवसात शिष्‍टमंडळाकडून या विभागाला भेट देवून केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली जाणार आहे.
मेन राजाराम हायस्‍कूल हे जिल्‍हा परिषदेकडून चालवले जाते. ही मालमत्ता जिल्‍हा परिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. तत्‍कालीन शिक्षण विभागासह जिल्‍हा न्यायाधीशांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यानंतर हायस्‍कूलने ही इमारत जिल्‍हा परिषदेच्या नावे करण्यासाठी अर्ज केले. मागील २४ वर्षांत पाच वेळा अर्ज केले आहेत. तसेच भूमापन अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून जिल्‍हा परिषदेच्या नावावर ही मालमत्ता करण्याची मागणी केली आहे. असे असताना, आजअखेर या विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही.
‘मेन राजाराम’च्या स्‍थलांतराबाबत चर्चा सुरू झाली आणि या मालमत्तेच्या कागदपत्रांची माहिती घेण्यात आली. त्यावेळी ही मालमत्ता जिल्‍हा परिषदेच्या ताब्यात दिल्याचे अनेक पुरावे आहेत. असे असताना नगरभूमापनने आजपर्यंत टाळाटाळ का केली, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे. ही इमारत जिल्‍हा परिषदेच्या नावे करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. विभागाला आवश्यक ती कागदपत्रेही पुरवली आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसात विभागाकडून केलेल्या कार्यवाहीची माहिती शिष्‍टमंडळाकडून घेतली जाणार आहे. जर नाव लावण्यास टाळाटाळ झाली तर मात्र आंदोलन करण्याचा निर्णय मेन राजाराम बचावासाठी पुढे आलेल्या नागरिकांनी व माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.