अजित ठाणेकर यांच्यातर्फे धन्यवाद मोदीजी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित ठाणेकर यांच्यातर्फे
धन्यवाद मोदीजी कार्यक्रम
अजित ठाणेकर यांच्यातर्फे धन्यवाद मोदीजी कार्यक्रम

अजित ठाणेकर यांच्यातर्फे धन्यवाद मोदीजी कार्यक्रम

sakal_logo
By

अजित ठाणेकर यांच्यातर्फे
‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रम
कोल्हापूर ः केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेपासून पात्र असलेले लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजप महानगर प्रवक्ते अजित ठाणेकर यांनी आयोजित केलेल्या ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध योजनांचा लाभ घेतलेल्या अनुराधा गोसावी, चव्हाण, अशोक लोहार आदींनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सुमारे २०० लाभार्थींनी मोदींना लिहिलेली ‘धन्यवाद मोदीजी’ ही पत्रे प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केली. बाबूराव ठाणेकर यांनी प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केले. ऊर्मिला कुलकर्णी यांनी त्यांना ‘डॉट मंडल’ पद्धतीने रेखाटलेले चित्र भेट दिले. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, नजीर देसाई, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, भाऊसाहेब गणपुले, प्रताप देसाई, प्रमोद जोशी, शैलेश मोरे, कपिल धर्माधिकारी, पांडुरंग यज्ञोपवीत उपस्थित होते.
‘भाजयुमो’चे प्रभाग अध्यक्ष ओंकार गोसावी, शुभंकर गोसावी, पार्थ शेट्ये, संग्राम घोरपडे, पुरुषोत्तम ठाणेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.