मिठारी यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठारी यश
मिठारी यश

मिठारी यश

sakal_logo
By

10752

अरहान मिठारी
‘वर्ल्ड फोरम’च्या
स्पर्धेत तृतीय
कोल्हापूर : भारत सरकारच्या वर्ल्ड फोरम फॉर आर्ट ॲड कल्चर स्पर्धेत कोल्हापूरच्या अरहान आशिष मिठारी याने तृतीय क्रमांक पटकाविला. त्याने सॅक्सोफोनमधील कौशल्य सादर केले. ही स्पर्धा ऑनलाईन झाली. डिसेंबरमध्ये बंगळूर येथे बक्षीस वितरण होईल. स्पर्धेची सुरवात ऑगस्टमध्ये झाली. त्यातंर्गत एकूण चार फेऱ्या झाल्या. शाहूपुरीतील सॅक्सोफोन वादक अरहान स्पर्धेत उतरला होता. अंतिम फेरीत सात स्पर्धक होते. त्यात त्याने तृतीय क्रमांक पटकाविला. प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तो सेंट झेवियर्स हायस्कूलचा विद्यार्थी असून, सहावीत शिकतो. त्याला की बोर्ड, बासरी व क्लॅप बॉक्सचे वादन करता येते. गेले वर्षभर तो सॅक्सोफोन वडील आशिष मिठारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाजविण्यास शिकत आहे. मिठारी म्हणाले, ‘‘अरहानच्या यशाने आनंदित झालो आहोत. त्याने वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले.’’