मारामारी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारामारी बातमी
मारामारी बातमी

मारामारी बातमी

sakal_logo
By

सोशल मीडियावर पोस्ट
टाकल्याने तरुणास मारहाण

सात जणांवर गुन्हा : सोनतळी येथील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः पेयजल योजनेची पोस्ट सोशल मीडियावर का टाकलीस, असा जाब विचारून सात जणांनी केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला. रविवारी (ता.१३) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सोनतळी (ता.करवीर) येथे हा प्रकार घडला. रामदास पांडुरंग पाटील (वय ३४ रा. प्रयाग चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. करवीर पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पाटील हे मित्राला सोडण्यासाठी सोनतळी येथे गेले होते. यावेळी संशयित सात जण हातात काठी घेऊन पाण्याच्या टाकीजवळ थांबले होते. ‘तू मोबाईलवर पेयजल योजनेची पोस्ट का टाकलीस’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्यानंतर पाण्याच्या पाटात ढकलून दिले.
पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश संभाजी पाटील, विवेक कुंडलिक कळके, राज शिवाजी पाटील (रा. तिघे प्रयाग चिखली), संजय पाटील, शिवाजी रंगराव पाटील, सुनील पाटील (रा. तिघे सोनतळी), गुरु कळके (रा.चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक पोतरे करीत आहेत.
-----------