विद्यार्थ्यांना योग शिक्षणाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना योग शिक्षणाची गरज
विद्यार्थ्यांना योग शिक्षणाची गरज

विद्यार्थ्यांना योग शिक्षणाची गरज

sakal_logo
By

62464
----------------------------------------------------------
विद्यार्थ्यांना योग शिक्षणाची गरज
प्रा. सदानंद वाली : नांगनुरात योग शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १५ : गतिमान जीवनामध्ये योगाला अनन्य साधारण महत्त्‍व आहे. योग साधनेमुळे आपण शारीरिक व्याधीवर मात करू शकतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे योगा अभ्यासक्रम शिकवला जातो. नेहमीच योगासने करणे काळाची गरज आहे. योगाबरोबरच मानवी जीवनामध्ये आयुर्वेदालाही मोठे महत्त्‍व आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य व योगधामचे अध्यक्ष सदानंद वाली यांनी केले.
नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे योग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. शिबिरार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. योगशिक्षक चव्हाण, शशिकांत मोहिते, सदानंद वाली, श्री. खापरे, श्री. गुरव, श्री. हुंचाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. शिबिरार्थींनी अनुभव व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक एस. बी. पाटील यांनी केले. माजी सरपंच शिवाजी मोकाशी, आप्पा जाधव, अशोक मोकाशी, सखाराम कासारकर आदी उपस्थित होते. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आप्पा जाधव यांनी आभार मानले.