यात्रा समिती मडिलगेत गठीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यात्रा समिती मडिलगेत गठीत
यात्रा समिती मडिलगेत गठीत

यात्रा समिती मडिलगेत गठीत

sakal_logo
By

यात्रा समिती
मडिलगेत गठित
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथील भावेश्वरी ग्रामदेवतेची यात्रा पुढीलवर्षी एप्रिलमध्ये होत आहे. २४ एप्रिलला यात्रेला प्रारंभ होईल. यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रेसंदर्भात ग्रामस्थांची बैठक झाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच गणपतराव अरळगुंडकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यात्रेच्या नियोजनासाठी स्थानिक देवस्थान समिती व नवीन यात्रा समिती अशी संयुक्त यात्रा समिती गठित केली. ज्येष्ठ नेते के. व्ही. येसणे यांची समितीच्या अध्यक्षपदी, सदानंद ऊर्फ संदीप बाळासो पाटील यांची सचिवपदी निवड केली. मंदिराची रंगरंगोटी, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, वीजपुरवठा यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे. याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे ठरले.