अर्बन बँक निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक निकाल
अर्बन बँक निकाल

अर्बन बँक निकाल

sakal_logo
By

KOP22L62628 , KOP22L62627

अर्बन बँकेत सत्ताधाऱ्यांची बाजी

सर्व जागांवर एकतर्फी विजय : दोन विद्यमान पराभूत, सहा नवे चेहरे संचालक मंडळात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत विरोधी भास्करराव जाधव पॅनेलचा धुव्वा उडाला. विरोधी पॅनेलमधील उमेश निगडे व गीता जाधव या दोन विद्यमान संचालकांचा पराभव झाला तर सत्तारूढ गटातील नऊ विद्यमान संचालक विजयी झाले. नव्या संचालक मंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
दरम्यान, निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रासह बँकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांची शहराच्या प्रमुख मार्गावरून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने जाऊन उमेदवारांनी बँकेचे संस्थापक कै. भास्करराव जाधव यांच्या शाहूपुरीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १३) चुरशीने ४८.०५ टक्के मतदान झाले होते. सर्वसाधारण गटातील दहा व राखीव गटातील पाच अशा १५ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत ३५ उमेदवार रिंगणात उतरले होते. बँकेचे २८ हजार ९८३ सभासद मतदानासाठी पात्र होते. यापैकी १३ हजार ७२९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळी आठ वाजता रमणमळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी एक वाजताच सत्तारूढ गटाच्या बाजून निकालाचा कौल स्पष्ट झाला होता.
..............
मतमोजणीचे नेटके नियोजन
मतमोजणीच्या नेटक्या नियोजनामुळे निकाल लवकर लागला. ४० टेबलवर प्रत्येकी एक केंद्र याप्रमाणे दोन टप्प्यातच मतमोजणी संपली. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांना सहायक निबंधक प्रदीप मालगावे, बाळासाहेब पाटील, उदय उलपे, मिलिंद ओतारी, नितीन माने यांनी सहकार्य केले.
..........
प्रमुख पराभूत
संचालक उमेश निगडे, संचालिका गीता रणजित जाधव, अजय इंगवले, प्रतापसिंह जाधव, अशोक बळीराम पोवार, गीता हसूरकर, अशोक भास्कर
..............
संचालक मंडळातील नवे चेहरे
माजी महापौर सुनीता राऊत, माजी नगरसेविका सौ. संध्या घोटणे, ॲड. प्रशांत शिंदे, संभाजी जगदाळे, अभिजित मांगुरे, नंदकिशोर मकोटे.
.............

‘गेली ९० वर्षे मी व माझे कुटुंबीय बँकेशी संबंधित आहे. या काळात आम्ही लोकांची कामे केली, त्यांची सेवा केली. हा निकाल या कामाची पोहचपावती आहे. ज्या उमेदीने, अपेक्षने लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्याच पद्धतीने या बँकेला कोणताही धक्का लागू देणार नाही. लोकांचा विश्‍वास सार्थ ठरवू.
शिरीष कणेरकर
पॅनेल प्रमुख, सत्तारूढ गट
.................
सभासदांचा कौल मान्य
या निवडणुकीतील सभासदांचा कौल मान्य आहे. यापुढेही बँक आणि सभासदांच्या हितासाठी कार्यरत राहू. नव्या संचालकांना शुभेच्छा.
उमेश निगडे
पॅनेलप्रमुख, विरोधी आघाडी
........
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते
सर्वसाधारण गट - शिरीष कणेकर-८८१५, ॲड. प्रशांत रामराव शिंदे-८२१६, राजन भोसले-८१६६, जयसिंग पांडुरंग माने-८०३१, अभिजित मांगुरे - ७९५५, संभाजी केशवराव जगदाळे-७७५६, मधूसुदन सावंत - ७७०१, ॲड. रवींद्र धर्माधिकारी - ७६३७, नंदकिशोर मकोटे- ७५०३, ॲड. यशवंतराव साळोखे - ७५०२
महिला प्रतिनिधी - सुनीता अजित राऊत - ८४२३, संध्या शेखर घोटणे- ८२३७
अनुसूचित जाती गट - नामदेवराव कांबळे - ८५२१
इतर मागासवर्गीय गट - सुभाष भांबुरे- ८९३४
विमुक्त जाती गट - विश्‍वास काटकर - ८७९३
....................
पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सर्वसाधारण गट - अजय इंगवले - ४२७३, प्रतापसिंह जाधव - ४२३०, अमोल डांगे - ३७९५, आबाराव देशमुख - ३४८५, उमेश निगडे - ४८७४, संदीप पाटील- ३५६८, अशोक पोवार - ४०७९, अतुल बोंद्रे - ४६२७, शिवाजी मोरे - ३४८५, रवींद्र सोळंकी - ३४१०, अपक्ष-रवींद्र गुरव - २५१, प्रकाश जाधव- ५७८.
महिला प्रतिनिधी - गीता जाधव - ४२९४, गीता हसूरकर - ३४१६
अनुसूचित जाती - अशोक भास्कर - ४०८२, अपक्ष-रणजित कवाळे - ४२३
इतर मागासवर्गीय - प्रसाद बुलबुले - ३८५२, अपक्ष - रवींद्र गुरव - १५८, संभाजी डोंगळे - ६३
विमुक्त जाती - प्रा. एकनाथ काटकर - ४२९७
..................