खुनाच्या सुत्रधाराला अटक करा ः गायकवाड कुटुंबाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाच्या सुत्रधाराला अटक करा ः गायकवाड कुटुंबाची मागणी
खुनाच्या सुत्रधाराला अटक करा ः गायकवाड कुटुंबाची मागणी

खुनाच्या सुत्रधाराला अटक करा ः गायकवाड कुटुंबाची मागणी

sakal_logo
By

(फोटो - 62535
....

खुनाच्या सूत्रधाराला अटक करा

कुमार गायकवाडच्या कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : राजेंद्रनगरमधील कुमार गायकवाड याचा रविवारी मध्यरात्री खून झाला. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र खुनाच्या सूत्रधाराला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी कुमार गायकवाड याच्या कुटुंबीयांनी केली आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राजेंद्रनगरमधील कुमारचे नातेवाईक आणि मित्रपरिवार राजारामपुरी पोलिस ठाण्यासमोर जमला होता. या वेळी पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी जमावाशी चर्चा केली व त्यांना परत पाठवले.
राजेंद्रनगरात वर्चस्ववादातून सतत वाद होत असतात. दोन गटांतील वादाचे पर्यावसन मारामारीत होऊन यामध्ये कुमार गायकवाड याचा खून झाला. या वादाचे पडसाद आजही उमटले. राजारामपुरी पोलिस ठाण्यासमोर राजेंद्रनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी आम्ही सांगतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी भूमिका घेतली. त्यानंतर काही जण पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना आपली बाजू सांगितली. मात्र बाहेरचा जमाव वाढत होता. काही काळ येथे तणावाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी बंकट सूर्यवंशी म्हणाले, ‘‘ज्यांनी कुमारला मारले असे आम्हाला वाटते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. आम्ही त्यांची नावे लेखी दिली आहेत. जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला नाही तर आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू.’’
त्यानंतर पोलिस निरीक्षक ईश्वर ओसामे यांनी जमावाशी चर्चा केली. ‘आम्ही कायदेशीर तपास करत आहे. तपासामध्ये ज्या बाबी समोर येतील त्यानुसार आम्ही कारवाई करू.’ यानंतर जमाव पांगला. अचानक या परिसरात जमाव जमल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.