भात सुगी हंगाम जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात सुगी हंगाम जोरात
भात सुगी हंगाम जोरात

भात सुगी हंगाम जोरात

sakal_logo
By

62545
---------
भात सुगी हंगाम जोरात
मजुरांची टंचाई; कामे उरकरण्यासाठी धांदल
कोवाड, ता. १६ ः चंदगड तालुक्यातील पूर्व भागात भाताच्या सुगीचा हंगाम जोरात सुरु आहे. भात कापणी, मळणी, वारे देणे व गवत गोळा करणे या कामांची धांदल उडाली आहे. मजूरांच्या टंचाईचा प्रश्न भेडसावत असला तरी त्यावर मात करत शेतकरी सुगीचा हंगाम उरकण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे.
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मे महिन्याच्या अखेरीला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भाताची कुरीच्या सहाय्याने पेरणी करतात. पश्चिम भागातील शेतकरी मात्र जुलै ते ऑगस्ट महिन्यात रोप लागण करतात. त्यामुळे पूर्व भागातील भात कापणीचा हंगाम लवकर येतो. नोव्हेंबरमध्ये पावसाने उघडीप दिल्याने पंधरा दिवसांपासून कोवाड, राजगोळी, माणगांव यासह पूर्व भागातील सर्वच गावांतून सुगीचा हंगाम जोरात सुरु आहे. जमीन अजून ओलसर असल्याने भात कापणीनंतर शेतकरी मळणीसाठी ट्रॅक्टरमधून भात माळरानावर घेऊन जात आहेत. त्यामुळे शेतातील मळणीची खळी यावर्षी हद्दपार झाल्याचे चित्र आहे. ट्रॅक्टरने मळणी काढली जात आहे. मळलेल्या भाताचे वारे देऊन शेतकरी भात घरी घेऊन जात आहेत. मळणीनंतर गवत उन्हात वाळवून गवताच्या गंजी घातल्या जात आहेत. सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे बाहेरगावाहून मजूर आणले जात आहेत. एकंदरीत सुगीच्या कामाला गती आल्याने शिवारं लोकांनी फुलली आहेत.