फिल्म सोसायटीतर्फे आज चित्रपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिल्म सोसायटीतर्फे आज चित्रपट
फिल्म सोसायटीतर्फे आज चित्रपट

फिल्म सोसायटीतर्फे आज चित्रपट

sakal_logo
By

बाबूराव पेंटर फिल्म
सोसायटीतर्फे आज ‘द डिसायपल’

कोल्हापूर, ता. १५ ः व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवलेला मराठी चित्रपट ‘द डिसायपल’ हा चित्रपट कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे बुधवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता चित्रपटरसिकांना राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पाहता येणार आहे.
तब्बल वीस वर्षांनी एका भारतीय आणि मराठी भाषेतील चित्रपटाने या चित्रपट महोत्सवात स्थान पटकावले आणि ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स’चा पुरस्कारही मिळवला. ‘कोर्ट’ चित्रपटाच्या राष्ट्रीय पातळीवरील लखलखीत यशानंतर चैतन्य ताम्हाणे या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाने हा मान संपादन केला. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न झालेला हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीताला समर्पित आयुष्य जगणाऱ्‍या शरद नेरूळकर याच्या आत्मशोधाची कथा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट असल्याने यातील संगीताची जबाबदारी खूप महत्त्वाची होती आणि ती अनिश प्रधान यांनी पेलली आहे. तर चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकलन चैतन्य ताम्हाणे यांनी केले आहे. या चित्रपटातील कलाकारांमध्ये आदित्य मोडक, अरुण द्रविड, सुमित्रा भावे, दीपिका भिडे-भागवत, किरण यज्ञोपवित, अभिषेक काळे, नीता खेडकर, मकरंद मुकुंद, क्रिस्टी बॅनर्जी, प्रसाद वनारसे आदींचा समावेश आहे.