आजरा ः संकेश्वर बांदा रस्त्याचे काम बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः संकेश्वर बांदा रस्त्याचे काम बंद
आजरा ः संकेश्वर बांदा रस्त्याचे काम बंद

आजरा ः संकेश्वर बांदा रस्त्याचे काम बंद

sakal_logo
By

62559
भादवण ः येथे सुरू असलेल्या महामार्गाचे काम बंद पाडताना शेतकरी
......

संकेश्वर -बांदा रस्त्याचे काम पाडले बंद
शेतकरी आक्रमक ः भादवण फाट्यावर बैठक, शुक्रवारी रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १५ ः संकेश्वर-बांदा महामार्गबाधित शेतकरी संघटनेने आज बाजूपट्टी सपाटीकरण करणाऱ्या जेसीबीना विनंती करत महामार्गाचे काम बंद पाडले. भादवण (ता. आजरा) येथे बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत रस्त्यात ठिय्या ठोकत आंदोलन केले. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. शुक्रवारी (ता. १८) आजऱ्यात रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा भादवण फाटा येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी दिला.
भादवण फाटा येथे आलेल्या महामार्गबाधित शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. रस्त्याचा मोबदला मिळाला पाहीजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची यांसह जोरदार घोषणाबाजी झाली. शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या ठोकत काम बंद पाडले. या वेळी कॉ. शिवाजी गुरव म्हणाले, ‘‘अनेक मोर्चे झाले, परिषदा झाल्या पण अद्याप सरकारने जाणीवपूर्वक बैठकीला बोलवलेले नाही किंवा नोटीस दिलेली नाही. नुकसानीबाबत कोणताही मोबदला दिलेला नाही. असे असताना रस्त्याचे काम करता येणार नाही. आमच्या मोबदल्याचे पहिल्यांदा सांगा, तुमच्या अखत्यारित रस्ता किती ते स्पष्ट करा. सध्या बाजूपट्टीच्या स्वच्छतेचे काम सुरू असले तरी ही बाजूपट्टी शेतकऱ्यांच्या नावावर आहे. त्याचा सातबारा काढून बघा. शेतकऱ्यांना मोबदला द्या मग हे काम करा. महामार्गाचे काम रोखण्याचा आमचा उद्देश नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा एवढी माफक अपेक्षा आहे.’’
याप्रसंगी कॉ. संजय तर्डेकर, निवृत्ती कांबळे, जयवंत थोरवतकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला गणपतराव डोंगरे, दत्तात्रय मोहिते, अण्णासो पाटील, चंद्रकांत जाखले, शिवाजी इंगळे, गणपती येसणे यांच्यासह आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.