कष्टाच्या जोरावर माळी समाजाची प्रगती ः प्रकाश आवाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कष्टाच्या जोरावर माळी समाजाची 
प्रगती ः प्रकाश आवाडे
कष्टाच्या जोरावर माळी समाजाची प्रगती ः प्रकाश आवाडे

कष्टाच्या जोरावर माळी समाजाची प्रगती ः प्रकाश आवाडे

sakal_logo
By

62622

कष्टाच्या जोरावर माळी समाजाची
प्रगती : प्रकाश आवाडे
कोल्हापूर : माळी समाज हा कष्टकरी आहे. कष्टाच्या बळावर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार, राजकारण विविध क्षेत्रांमध्ये कर्तबगारीचे मळे फुलविले आहेत, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हातर्फे पुरस्कार वितरण सोहळा, समाज मेळावा तसेच वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आवाडे बोलत होते. त्यांच्या हस्ते पट्टणकोडोली येथील उद्योजक चंद्रकांत महादेव माळी यांना समाजभूषण पुरस्कार, तर पोहाळे येथील योग विद्याधामचे अध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र चौगुले यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे रविवारी हा सोहळा झाला. याप्रसंगी राजेंद्र माळी, शिवानंद माळी यांचा सत्कार झाला. या वेळी उद्योजक अशोक माळी, युवराज माळी, सुनील गाताडे, राजेंद्र शिवाजी माळी उपस्थित होते. मानपत्राचे वाचन महिला आघाडीच्या उपाध्यक्षा साधना माळी व संघटनेचे सचिव शिक्षक संतोष माळी यांनी केले. संघटनेचे उपाध्यक्ष अनिल माळी आभार मानले. कार्यक्रमाला विजयराव धुळबूळ, प्राचार्य जी. पी. माळी, अण्णासाहेब माळी, उद्योजक प्रभाकर कुलगुडे, राजेंद्र माळी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी माळी आदी उपस्थित होते.