नाले प्रक्रिया केंद्राकडे वळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले प्रक्रिया केंद्राकडे वळावा
नाले प्रक्रिया केंद्राकडे वळावा

नाले प्रक्रिया केंद्राकडे वळावा

sakal_logo
By

नाले प्रक्रिया केंद्राकडे वळावा
जिल्हाधिकारी रेखावार; मार्च अखेर कामे पूर्ण करण्याच्या सुचना
कोल्हापूर, ता. १६ : महानगरपालिकेच्या कत्तलखान्याऐवजी रस्त्यावर जनावरे कापणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा तसेच पंचगंगा नदी थेट पाणी मिसळत असणाऱ्या नाले प्रक्रिया केंद्राकडे वळावेत. मार्च अखेर ही काम पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदुषण नियंत्रण बैठक़ झाली. यावेळी ते बोलत होते.
रेखावार म्हणाले, ‘‘पंचगंगा नदी प्रदुषणामूक्त करण्यासाठी तातडीच्या उपाय-योजना कराव्या लागतील. यामध्ये सर्वप्रथम ज्या नाल्यांमुळे नदीत थेट पाणी मिसळते असे नाले थांबवले पाहिजेत किंवा प्रक्रिया केंद्राकडे वळवले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्यावतीने शोष खड्ड्यांचे काम सुरु आहे. ही कामे वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजे. डिसेंबर अखेर ही सर्व कामे पूर्ण करावीत. त्यानुसार त्याचे नियोजन झाले पाहिजे. शोष खड्ड्यांमुळे ग्रामीण भागातील सांडपाणी नदीत जाण्यास मज्जाव होईल. औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे सर्वाधिक प्रदुषण होत आहे. याबद्दल अनेकवेळा सुचना दिल्या आहेत. हे पाणी बगीचा किंवा शेतीसाठी वापरले पाहिजे. याचा निश्‍चितपणे फायदा होणार आहे.’’ या वेळी जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, प्रदुषण मंडळाचे प्रादेशिक जगन्नाथ साळुंखे, सुधाकर देशमुख उपस्थित होते.
---------------
चौकट
दुरुस्त्या तत्काळ करा
पंचगंगा नदी प्रदुषित होण्यास कारणीभूत असणाऱ्या २९ गावांमधील पाणी गावचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये काही दुरुस्त्या सूचवल्या आहेत. त्या दुरुस्त्या तत्काळ केल्या पाहिजेत. दुरुस्ती झाल्यानंतर याचा पाठपुरावाही त्याच गतीने झाला पाहिजे, अशाही सूचना रेखावार यांनी दिल्या आहेत.