अप्पर जिल्हाधिकारीपदी संजय शिंदे यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्पर जिल्हाधिकारीपदी संजय शिंदे यांची नियुक्ती
अप्पर जिल्हाधिकारीपदी संजय शिंदे यांची नियुक्ती

अप्पर जिल्हाधिकारीपदी संजय शिंदे यांची नियुक्ती

sakal_logo
By

फोटो
62664
....

अपर जिल्हाधिकारीपदी
संजय शिंदे यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूरच्या अपर जिल्हाधिकारीपदी रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. माजी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार हे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर शिंदे यांची बदली झाली आहे. महसूल व वन विभागाच्या सचिवांनी हे आदेश काढले आहेत. दरम्यान, शिंदे हे दोन दिवसांत आपला पदभार स्वीकारणार आहेत.
संजय शिंदे सध्या रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी येथे काम पाहिले होते. जिल्ह्यात महापुरासह कोरोना काळात शिंदे यांनी चांगली कामगिरी केली होती.