शरद गायकवाड यांचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद गायकवाड यांचे कार्यक्रम
शरद गायकवाड यांचे कार्यक्रम

शरद गायकवाड यांचे कार्यक्रम

sakal_logo
By

62665
कोल्हापूर : लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.

लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम
कोल्हापूर : ‘‘छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य चळवळीचा वसा, वारसा प्राणपणाने जोपासनारे लहुजी साळवे हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे कृतिशील आधारस्तंभ होते,’’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी केले. लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे ‘लहुजी साळवे जीवन व कार्य’ यावर ते बोलत होते. अॅड. दत्ताजी कवाळे अध्यक्षस्थानी होते. क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गौरव कार्यक्रम झाला. डॉ. गायकवाड म्हणाले, ‘‘पुण्यात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबर ज्ञानक्रांती करून सत्यशोधक चळवळीचा आधारवड बनून मानवतावादी चळवळीचा आधारस्तंभ म्हणून लहुजींनी केलेले कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.’’ न्यूरोसर्जन डॉ. कौतुक वाईकर, अन्नधान्य वितरण अधिकारी डी. एम. सनगर, अॅड. राहुल सडोलीकर, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, इंद्रजीत पाटील, अतुल पाटील, एम. एम. चव्हाण, महावीर पाटील, राहुल गणेशाचार्य, विनोद जगताप आदींचा सत्कार झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे यांनी स्वागत केले. सुनील सामंत यांनी सुञसंचालन केले. अमोल कुरणे यांनी आभार मानले.