रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा
रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा

रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा

sakal_logo
By

62675
---------
रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा
मनसेतर्फे महापालिका उपायुक्तांकडे मागणी; आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी, ता. १६ : शहरामधील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या दूरवस्थेत असलेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना दिले. यावेळी मागणीबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने येथे वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गावर रहदारीचे प्रमाण अधिक असते. मात्र मार्गांची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते, हे समजण्यास मार्ग नाही. परिणामी अपघातांची संख्या वाढत असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे शहरातील मार्गांची तत्काळ दुरुस्ती करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात शहराध्यक्ष प्रतापराव पाटील, उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर, शहाजी भोसले, विनायक मुसळे, महेश शेंडे, अनिल झाडबुके, रामचंद्र बागलकोटे, योगेश दाभोळकर, सचिन कटके आदी उपस्थित होते. 

जगताप
----------जेेरे------12.40----