गांधीनगर सोसायटी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर सोसायटी निवड
गांधीनगर सोसायटी निवड

गांधीनगर सोसायटी निवड

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad164.jpg

62775
कृष्णा जाधव, वैशाली कागवाडे
---------------------------------------------
गांधीनगर सोसायटीचे जाधव
अध्यक्ष, कागवाडे उपाध्यक्ष
गडहिंग्लज, ता. 16 : येथील गांधीनगर को-ऑप हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी कृष्णा जाधव यांची तर उपाध्यक्षपदी सौ. वैशाली कागवाडे यांची एकमताने निवड करण्यात आली. सहायक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपीक व्ही. एम. तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही प्रक्रिया झाली.
श्री. जाधव यांचे नाव मिलिंद कोरी यांनी सुचवले, अजित वंटमुरे यांनी अनुमोदन दिले. सौ. कागवाडे यांचे नाव डॉ. राजश्री पट्टणशेट्टी यांनी सुचवून सौ. रुपाली कोरवी यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, नव्या नियमानुसार कोषाध्यक्ष पदावर राजेंद्र पाटील यांना तर सचिव म्हणून जितेंद्र पाटील यांना संधी देण्यात आली. त्यांना अनुक्रमे अजित वंटमुरे, डॉ. दिलीप माळवे, महेश घुगरे व अरुण तेलंग यांनी सूचक व अनुमोदन दिले. सर्व संचालक व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती साधण्याचे व सभासदांसाठी विविध योजना राबविण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी व्यक्त केला. संचालक नितीन देसाई, अविनाश मडलगी, राजन जाधव, सचिव सुरेश मस्ती उपस्थित होते. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.