वालचंद महाविद्यालय इव्हेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वालचंद महाविद्यालय इव्हेंट
वालचंद महाविद्यालय इव्हेंट

वालचंद महाविद्यालय इव्हेंट

sakal_logo
By

सांगलीसह ऑलला
.......................

‘वालचंद’मध्ये ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट-२०२२’

२६, २७ नोव्हेंबरला आयोजन : ‘सकाळ माध्यम समूह’ प्रायोजक
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १६ ः वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (ईएलईएसए) व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट २०२२’ या राज्यस्तरीय इव्हेंटचे आयोजित केला आहे. येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी हा इव्हेंट होणार आहे. ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. फिनआयक्यू कंपनी मुख्य प्रायोजक आहे.
‘इलेक्‍ट्रोव्हर्ट’ हा इव्हेंट प्रतिवर्षी महाविद्यालयात आयोजित केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत खंड पडला होता. आता पुन्हा व्यापक प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. हा इव्हेंट टेक्निकल व नॉन-टेक्निकल विभागात होणार आहे. संचालक पी. जी. सोनावणे, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे अधीष्ठाता ए. ए. आगाशे, समन्वयक आर. जी. मेवेकरी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संजय धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखील हा राज्यस्तरीय इव्हेंट होणार आहे. एक लाखांपर्यंत पारितोषिके आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इंजिनिअरिंगच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इव्हेंट उपयुक्त आहे. राज्यस्तरीय इव्हेंट असल्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ईएलईएसए व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संजय धायगुडे यांनी केले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी https://www.elesa.co.in/electrovert/ वर भेट द्यावी. इव्हेंटचे प्रेसिडेंट सत्यम बलदवा, व्हाईस प्रेसिडेंट निहारिका पवार, खजिनदार गौरव काथार, अनिरुद्ध गोडबोले, मधुरा हेर्लेकर, श्रेयस शेवळे, शर्ली जेकॉब, सिद्धी मोदी यांच्यासह टीम संयोजन करत आहे.
...

चौकट

आठ विभागात होणार स्पर्धा
यंदाच्या इव्हेंटमध्ये आठ विविध विभागांत स्पर्धा आहेत. स्पर्धा व स्पर्धक संख्या अशी : प्रोजेक्ट प्रेझेंटेशन (४ स्पर्धक), टेकविझ (दोन स्पर्धक), कोडव्हर्ट (१ स्पर्धक), मिन्डकार्फ्ट (१ स्पर्धक), इंटरस्टेलर (१ स्पर्धक), इलोक्वेन्स (२ स्पर्धक), गॅलॅटिक व्हेन्चर्स (२ स्पर्धक), इनिग्मा (२ स्पर्धक).