साने गुरुजी पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साने गुरुजी पुरस्कार
साने गुरुजी पुरस्कार

साने गुरुजी पुरस्कार

sakal_logo
By

साने गुरुजी पुरस्कारासाठी
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
गडहिंग्लज, ता. १७ : येथील पालिकेच्या पू. साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या‍ साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी अनुवादित साहित्यिकांनी आपले साहित्य पाठवावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले आहे. दरवर्षी साने गुरुजी वाचनालयातर्फे साहित्य पुरस्कार देण्यात येतो. रोख २५ हजार, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते. २४ डिसेंबरला पू. साने गुरुजी लोकशिक्षण व्याख्यानमालेत या पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाचा साहित्य पुरस्कार अनुवादित साहित्य या वाङ्‍मय प्रकाराला दिला जाणार आहे. २०१८ ते २०२१ या चार वर्षांत प्रसिद्ध झालेल्या साहित्याचा विचार या पुरस्कारासाठी केला जाईल. अनुवादित साहित्य क्षेत्रात लेखकाने केलेले भरीव कार्यही विचारात घेतले जाणार आहे. राज्यातील अनुवादित साहित्यिकांनी वरील कालावधीतील प्रसिद्ध झालेल्या साहित्याच्या प्रत्येकी तीन प्रती व संपूर्ण माहिती ५ डिसेंबरपर्यंत मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगर परिषद यांच्या नावे पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.