झेप अकॅडमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेप अकॅडमी
झेप अकॅडमी

झेप अकॅडमी

sakal_logo
By

झेप अकॅडमीला टॅली
कोर्ससाठी मान्यता

गडहिंग्लज, ता. १६ : येथील झेप अकॅडमीमध्ये यावर्षीपासून टॅली अभ्यासक्रम सुरु करण्यास शिवाजी विद्यापीठाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘२०१७ मध्ये ज्ञानदीप प्रबोधिनीची स्थापना झाली. प्रामुख्याने गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागलसह सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मार्गदर्शन स्थानिक पातळीवर व माफक शुल्कात मिळण्यासाठी संस्थेने प्रबोधिनीतर्फे झेप अकॅडमी सुरु केली. आतापर्यंत अकॅडमीच्या २१ प्रशिक्षणार्थींना शासकीय, निमशासकीय सेवेत संधी मिळाली आहे. सध्या येथे राज्यसेवा, सरळ सेवा, बॅंकिंग, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या परीक्षांची तयारी करुन घेतली जाते. पोलिस व सैन्य भरतीचे शारीरिक चाचणी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कमी शुल्कात सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज ग्रंथालय व वातानुकुलीत अभ्यासिकाही सुरू केली आहे.
दरम्यान, टॅलीसह ट्रॅव्हल्स व टुरिझम हे अभ्यासक्रम सुरु करण्यास विद्यापीठाने परवानगी दिली होती. त्यापैकी टॅली या कोर्ससाठी यावर्षी मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. प्रवेशाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. इच्छुकांनी ‘झेप’च्या अधीक्षिका गौरी बेळगुद्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.